कसारा घाटात रेल्वेमार्गावर पुन्हा दरड कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 01:16 AM2019-07-27T01:16:17+5:302019-07-27T01:16:58+5:30
दोन दिवसांपासून घाटमाथ्यावर पडत असलेल्या पावसामुळे कसारा घाटात शुक्रवारी (दि. २६) पहाटे रेल्वेमार्गावर मोठी दरड कोसळली. याचवेळी मुंबईला जाणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेस चालकाच्या ही बाब लक्षात आल्याने त्याने गाडी थांबविल्यामुळे अनर्थ टळला. पंधरा दिवसांपूर्वीच घाटातील बोगद्याबाहेर दरड कोसळली होती.
इगतपुरी : दोन दिवसांपासून घाटमाथ्यावर पडत असलेल्या पावसामुळे कसारा घाटात शुक्रवारी (दि. २६) पहाटे रेल्वेमार्गावर मोठी दरड कोसळली. याचवेळी मुंबईला जाणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेस चालकाच्या ही बाब लक्षात आल्याने त्याने गाडी थांबविल्यामुळे अनर्थ टळला. पंधरा दिवसांपूर्वीच घाटातील बोगद्याबाहेर दरड कोसळली होती. आठवडाभरापूर्वी अंत्योदय एक्स्प्रेसचा डबा रेल्वे घाटातील पुलावर रु ळावरून घसरल्याने मोठी दुर्घटना टळली होती. तसेच मुंबई-आग्रा महामार्गावरदेखील दोन वेळा दरड व एक वेळा झाड कोसळण्याची घटना घडली होती.
इगतपुरी परिसरातील घाटात जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे शुक्रवारी घाटातील मुंबईच्या दिशेने जाणाºया तीन नंबर बोगद्याजवळ रेल्वेमार्गावर दरड कोसळली. याच रु ळावरून मुंबईच्या दिशेने देवगिरी एक्स्प्रेस जात होती. घाटात धुके असूनही देवगिरीच्या चालकाला ही दरड कोसळल्याचे लक्षात येताच त्यांनी गाडी थांबविल्याने अनर्थ टळला. या घटनेची माहिती चालकाने रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी एस.एस. बर्वे, स्टेशनमास्तर प्रेमचंद आर्य यांना दिली. रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी व कर्मचारी तसेच रेल्वे आपत्कालीन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन रु ळावर पडलेली दरड बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले. या घटनेमुळे मुंबईला जाणारी देवगिरी एक्स्प्रेस सुमारे दीड तास कसारा घाटात उभी होती. रेल्वे रु ळावरील दरड काढल्यानंतर २मुंबईला रवाना करून रेल्वे वाहतूक सुरळीत झाली. दरम्यान, मुंंबईला जाणारी व मुंबईहून येणारी वाहतूक सुरळीत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.