रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कार्यालयात महात्मा फुले जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 18:41 IST2021-04-11T17:24:52+5:302021-04-11T18:41:30+5:30
मनमाड : येथील ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन ओपन लाईन कार्यालयात महात्मा फुले जयंती साजरी करण्यात आली.

रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कार्यालयात महात्मा फुले जयंती
मनमाड : येथील ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन ओपन लाईन कार्यालयात महात्मा फुले जयंती साजरी करण्यात आली.
अध्यक्षस्थानी प्रदिप गायकवाड तर प्रमुख पाहुणे म्हणून झोनल सचिव सतिश केदारे, रत्नदीप पगारे आदी उपस्थित होते. .
शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला असोसिएशन वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे पालन करून कार्यक्रम घेण्यात आला. सुत्रसंचालन सम्राट गरूड यांनी तर आभार प्रदर्शन अर्जुन बागुल यांनी केले.
मनमाड येथे ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशनच्या वतीने महात्मा फुले जयंती प्रसंगी प्रदिप गायकवाड, सतिश केदारे, रत्नदीप पगारे,अर्जुन बागुल, सम्राट गरुड आदी.