नोव्हेंबर महिन्यामध्ये रेल्वेची मालवाहतूक झाली उच्चांकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:25 AM2020-12-03T04:25:09+5:302020-12-03T04:25:09+5:30
नोव्हेंबर महिन्यामध्ये रेल्वेने १०६.६८ मेट्रिक टनांची मालवाहतूक केली आहे. मागील वर्षाच्या नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत यामध्ये नऊ टक्क्यांनी वाढ झाली ...
Next
नोव्हेंबर महिन्यामध्ये रेल्वेने १०६.६८ मेट्रिक टनांची मालवाहतूक केली आहे. मागील वर्षाच्या नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत यामध्ये नऊ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या काळामध्ये रेल्वेला यापासून १०,६५७.६६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षाच्या तुलनेमध्ये हे चार टक्क्यांनी जास्त आहे. मागील वर्षी रेल्वेला १०,२०७.८७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.
या महिन्यामध्ये ४८.४८ दशलक्ष टन कोळसा, १३.७७ दशलक्ष टन लोहखनिज ५.१ दशलक्ष टन खाद्यान्न,५.४१ दणलक्ष टन खते आणि ६.६२ दशलक्ष टन सिमेंटची वाहतूक केली आहे.