रेल्वे महाव्यवस्थापकांची मनमाड रेल्वे स्थानकाला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 00:44 IST2021-01-16T21:07:19+5:302021-01-17T00:44:57+5:30
मनमाड : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी मनमाड रेल्वे स्थानकावर भेट देऊन वार्षिक तपासणी केली. या तपासणीदरम्यान सर्व विभागांचे प्रधान प्रमुख, विवेक कुमार गुप्ता, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, भुसावळ विभाग आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

रेल्वे महाव्यवस्थापकांची मनमाड रेल्वे स्थानकाला भेट
मनमाड : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी मनमाड रेल्वे स्थानकावर भेट देऊन वार्षिक तपासणी केली. या तपासणीदरम्यान सर्व विभागांचे प्रधान प्रमुख, विवेक कुमार गुप्ता, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, भुसावळ विभाग आणि इतर अधिकारी उपस्थित होते. नमाड येथील स्टेशन परिसर, अपघात निवारण ट्रेन, रनिंग रूम व रेल्वे शाळेची ई-लर्निंग डिस्प्लेची मित्तल यांनी पाहणी केली. आमदार सुहास कांदे यांनी त्यांची भेट घेऊन रेल्वेशी संबंधित विविध विषयांवर चर्चा केली.
उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांनी पात्र रेल्वे कर्मचाऱ्यांना पुरस्कारही प्रदान केले. तपासणीदरम्यान सर्व कोविड नियमांचे विधिवत पालन करण्यात आले.