दिव्यांगांसाठी रेल्वे पास शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 01:07 AM2019-03-30T01:07:21+5:302019-03-30T01:07:45+5:30
शिवसह्याद्री सामाजिक संस्था व दिव्यांग कल्याणकारी संघटना यांच्या वतीने दिव्यांगांसाठी रेल्वे पास वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
नाशिक : शिवसह्याद्री सामाजिक संस्था व दिव्यांग कल्याणकारी संघटना यांच्या वतीने दिव्यांगांसाठी रेल्वे पास वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
दिव्यांग व्यक्तीला पास मिळण्यास येणाऱ्या अडचणी, पाससाठीची लांबलचक रांग, पाससाठी स्थानकात जाणे यांसारख्या समस्यांमुळे दिव्यांगांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यांच्या अडचणी आणि धावपळ दूर करण्यासाठी ठक्कर बाजार येथे शिबिर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी शंभर दिव्यांग व्यक्तींनी रेल्वे पास नोंदणी शिबिरात नावनोंदणी केली. शिव सह्याद्री संस्थेचे अध्यक्ष सचिन पानमंद यांनी दिव्यांग व्यक्तींना रेल्वेकडून देण्यात येणाऱ्या सवलतींविषयी मार्गदर्शन केले. ज्यांना अद्यापही नोंदणी करावयाची आहे त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन दिव्यांग कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष बबलू मिर्झा यांनी केले. याप्रसंगी सुरजित सेनगुप्ता, सतीश गुंजाळ, विशाल होनमाने, राजेंद्र सोनवणे आदी उपस्थित होते.