रेल्वेसेवा विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 01:08 AM2018-11-19T01:08:46+5:302018-11-19T01:09:15+5:30
कल्याण येथील पत्री पूल पाडण्यासाठी मध्य रेल्वेने रविवारी (दि.१८) सहा तासांचा विशेष मेगाब्लॉक घेतल्याने रेल्वेची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली त्याचा फटका नाशिकच्या प्रवाशांनाही बसला. पंचवटी, गोदावरी, राज्यराणीसह अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या, तर भुसावळ-पुणे एक्स्प्रेस नाशिकऐवजी दौंडमार्गे धावली. दुपारी साडेतीननंतरही वाहतूक सुरळीत झाली नाही. मात्र सायंकाळी वाहतूक काही प्रमाणात पूर्ववत झाली.
नाशिकरोड : कल्याण येथील पत्री पूल पाडण्यासाठी मध्य रेल्वेने रविवारी (दि.१८) सहा तासांचा विशेष मेगाब्लॉक घेतल्याने रेल्वेची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली त्याचा फटका नाशिकच्या प्रवाशांनाही बसला. पंचवटी, गोदावरी, राज्यराणीसह अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या, तर भुसावळ-पुणे एक्स्प्रेस नाशिकऐवजी दौंडमार्गे धावली. दुपारी साडेतीननंतरही वाहतूक सुरळीत झाली नाही. मात्र सायंकाळी वाहतूक काही प्रमाणात पूर्ववत झाली.
मागील आठवड्यात इगतपुरी रेल्वेस्थानकात महिनाभर सुरू असलेल्या कामांमुळे रेल्वेचे नुकसान झाले होते. आता कल्याणला विशेष मेगाब्लॉक घेण्यात आला. कल्याणचा विशेष मेगाब्लॉक असला तरी काही गाड्या नाशिकरोड स्थानकातून सकाळी धावल्या. नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस मुंबईला न जाता नाशिकरोडपर्यंतच धावली. तेथूनच ती नागपूरला गेली. मुंबईहून पहाटे सुटलेली काशी एक्स्प्रेस सकाळी दहाला नाशिकरोडला आली. पवन आणि कामायनी एक्स्प्रेसही आल्या. सकाळी बनारस सुपर पावणे नऊला आली. देवळाली-भुसावळ शटल पहाटे पाचला गेली. भुसावळवरून सुटणारी हावडा-मुंबई एक्स्प्रेस, वाराणसी-एलटीटी आणि राजेंद्रनगर-पटना एक्स्प्रेस या गाड्या जळगाव-वसईरोड-दिवामार्गे धावली. एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस,एलटीटी-दरभंगा पवन एक्स्प्रेस याच मार्गाने भुसावळला गेली.
जादा बसेस : रेल्वे प्रवाशांसाठी महामंडळाचे नियोजन
दरम्यान, रेल्वे सेवा बंद असल्याने नाशिकरोड एसटी स्टॅन्डवर रविवारी गर्दी होती. या स्थानकातून आज पाचशे फेऱ्या झाल्या. त्यात लांबपल्ल्याच्या ३३० तर शहर बस वाहतुकीच्या २०० फेºयांचा समावेश होता. एसटी गाड्या मर्यादित असल्याने प्रवाशांची गाडीत जागा मिळविण्यासाठी चढाओढ होती.