रेल्वेस्थानक : प्रशासनाने राबविली धडक मोहिम मनमाडला अतिक्रमण उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 12:16 AM2018-03-09T00:16:01+5:302018-03-09T00:16:01+5:30
मनमाड : मनमाड रेल्वेस्थान काजवळील रेल्वे रूळालगत असलेले अतिक्रमण काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून धडक मोहीम राबविण्यात आली.
मनमाड : मनमाड रेल्वेस्थान काजवळील रेल्वे रूळालगत असलेले अतिक्रमण काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून धडक मोहीम राबविण्यात आली. भुसावळ, चाळीसगाव, नाशिक, मनमाड येथील रेल्वे सुरक्षा बलाच्या बंदोबस्तात सदरची कारवाई करण्यात आली.
मनमाड रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक एकला खेटून असलेल्या रूळालगत सुमारे ५० वर्षांपूर्वी काहींनी झोपड्या बांधल्या होत्या. सदर झोपड्या रेल्वेच्या जागेवर असल्याचे सांगत त्या हटविण्यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली.
भुसावळ विभागाचे रेल्वे सुरक्षा बलाचे सुरक्षा सहायक आयुक्त सुरेश चंद्र, निरीक्षक के.डी. मोरे, नाशिकचे आरपीएफ इन्स्पेक्टर जुबेर पठाण, चाळीसगावचे आरपीएफ इन्स्पेक्टर नरेश सावंत, सहायक निरीक्षक रजनीश यादव, रेल्वे पोलीस निरीक्षक एन.के. मदने, सहायक निरीक्षक नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली मोठा बंदोबस्त तैनात केला होता. यावेळी शहर पोलिसांची मदत घेऊन बंदोबस्त ठेवण्यात आला होता. स्टेशनमास्तर संजय गलांडे यांच्यासह रेल्वेचे इतर अधिकारी उपस्थित होते.