रेेल्वेस्थानक परिसर पुन्हा बहरतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:42 AM2021-01-08T04:42:21+5:302021-01-08T04:42:21+5:30
मुक्तिधामसमोरील रस्त्यावर अतिक्रमण नाशिक : नाशिकरोड येथील मुक्तिधाम मंदिराच्या प्रवेशद्वारालगत असलेली दुकाने तसेच दुकानांसमोर उभ्या राहाणाऱ्या वाहनांमुळे मुख्य रस्त्यावरील ...
मुक्तिधामसमोरील रस्त्यावर अतिक्रमण
नाशिक : नाशिकरोड येथील मुक्तिधाम मंदिराच्या प्रवेशद्वारालगत असलेली दुकाने तसेच दुकानांसमोर उभ्या राहाणाऱ्या वाहनांमुळे मुख्य रस्त्यावरील वाहनांना अडथळा होत आहे. तसेच काही हातगाडीवालेदेखील रस्त्यावर उभे राहत असल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत असून वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.
वाहतूक पोलीस नसल्याचे धोका
नाशिक : शासनाच्या आदेशाप्रमाणे इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. त्यामुळे शाळांचा परिसर पुन्हा गजबजला आहे. रस्त्यावरील शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक तसेच विद्यार्थ्यांच्या दुचाकीमुळे शाळांसमोरील गर्दी वाढत आहे. ज्या शाळा रस्त्यालगत आहेत अशा ठिकाणी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी होत आहे.
दुर्गंधीयुक्त नाल्याने नागरिक त्रस्त
नाशिक : नााशिक पुणे रोडवरील क्रोमा कॉर्नर ते टाकळीगावापर्यंत नाला वाहत असून, या नाल्याच्या दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. सकाळी तसेच सायंकाळच्या सुमारास नाल्यातून दुर्गधी येत असल्याने या नाल्याची नियमित स्वच्छता करण्याची मागणी होत आहे.
सोमेश्वर परिसरात वाढली गर्दी
नाशिक : गोदावरी नदीला पाणी सोडण्यात आल्यामुळे सोमेश्वर धबधबा वाहू लागला आहे. त्यामुळे सोमेश्वर परिसरात पुन्हा एकदा पर्यटक वळले आहेत. या ठिकाणी प्रेमीयुगलांचाही वावर वाढल्याने पोलिसांनी महिला पोलिसांची गस्त वाढविली असून, पोलीस कारवाईदेखील करीत आहेत.