मालगाडी घसरल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2022 12:13 AM2022-03-16T00:13:37+5:302022-03-16T00:17:02+5:30

मनमाड : मनमाड-दौंड लोहमार्गावर अहमदनगर रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचा डबा घसरल्याची घटना सोमवारी (दि.१४) मध्यरात्री घडली. त्यामुळे या मार्गावरून येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्यांना तब्बल तीन ते चार तासाचा विलंब झाला. दौंडहून मनमाडकडे येणाऱ्या आणि मनमाडहून दौंडकडे जाणाऱ्या अनेक गाड्या विविध रेल्वे स्थानकात अपघातामुळे खोळंबून होत्या.

Railway traffic disrupted due to derailment | मालगाडी घसरल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत

मालगाडी घसरल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत

Next
ठळक मुद्दे अनेक गाड्या विविध रेल्वे स्थानकात अपघातामुळे खोळंबून होत्या.

मनमाड : मनमाड-दौंड लोहमार्गावर अहमदनगर रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचा डबा घसरल्याची घटना सोमवारी (दि.१४) मध्यरात्री घडली. त्यामुळे या मार्गावरून येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्यांना तब्बल तीन ते चार तासाचा विलंब झाला. दौंडहून मनमाडकडे येणाऱ्या आणि मनमाडहून दौंडकडे जाणाऱ्या अनेक गाड्या विविध रेल्वे स्थानकात अपघातामुळे खोळंबून होत्या.
मालगाडीचा डबा घसरल्याने पुणे-पटना श्रमिक एक्स्प्रेस, कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस, तसेच पुणे-नांदेड हडपसर एक्स्प्रेस या गाड्या तब्बल चार तास विलंबाने धावत होत्या. त्याबरोबरच तांत्रिक अडचणीमुळे उत्तर भारतातून भुसावळमार्गे मनमाड-मुंबईला जाणाऱ्या अनेक गाड्या पाच-सहा तासाच्या विलंबाने धावत होत्या. यात भुवनेश्वर-एलटीटी कुर्ला तीन तास, पाटलीपुत्र-कुर्ला ४ तास ३० मिनिटे, गुवाहाटी-कुर्ला ४ तास, हावडा-मुंबई-मेल ६ तास, वाराणसी-मुंबई महानगरी एक्स्प्रेस ८ तास तसेच जम्मुतावी-पुणे झेलम एक्स्प्रेस ही गाडी ३ तास विलंबाने धावत होत्या.

Web Title: Railway traffic disrupted due to derailment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.