नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 11:12 PM2019-01-10T23:12:51+5:302019-01-11T00:36:53+5:30
मध्य रेल्वे विभागातील इगतपुरी रेल्वेस्थानकातील पादचारी पुलावर गर्डर बसविण्यासाठी पॉवर ब्लॉक घेण्यात येणार असल्याने शुक्रवार ते रविवार (११ ते १३ जानेवारी) काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच काही रेल्वे मार्गाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
नाशिकरोड : मध्य रेल्वे विभागातील इगतपुरी रेल्वेस्थानकातील पादचारी पुलावर गर्डर बसविण्यासाठी पॉवर ब्लॉक घेण्यात येणार असल्याने शुक्रवार ते रविवार (११ ते १३ जानेवारी) काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच काही रेल्वे मार्गाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
इगतपुरी रेल्वेस्थानकातील पादचारी पुलावर गर्डर टाकण्याच्या कामासाठी शुक्रवार ते रविवार पहाटे ३.४५ ते सकाळी साडेदहापर्यंत पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे तीनही दिवस मुंबई-भुसावळ पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे. शनिवारी (दि.१२) एलटीटी-गुवाहटी एक्स्प्रेस सकाळी आठऐवजी ९.१० वाजता, सीएसएसटी-नांदेड तपोवन एक्स्प्रेस सकाळी सव्वा सहाऐवजी नऊला सुटणार आहे. एलटीटी-फैजाबाद रायबरेली एक्स्प्रेस ही दिवा-वसई, जळगाव मार्गे पुढे जाणार आहे. तर सीएसटी-हावडा गीतांजली एक्स्प्रेस कल्याण-दौंड-मनमाड मार्गे, एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस दिवा-वसईरोड-जळगाव मार्गे पुढे जाणार आहे.
रविवारी (दि.१३) एलटीटी-अलाहाबाद एक्स्प्रेस व एलटीटी-गोरखपूर काशी एक्स्प्रेस दिवा-वसई-जळगाव मार्गे, सीएसटी-हावडा गीतांजली एक्स्प्रेस कल्याण-दौंड-मनमाड मार्गे पुढे जाणार आहे. एलटीटी-कामाख्या एक्स्प्रेस सकाळी पावणे आठऐवजी ९.१० वाजता, एलटीटी-भागलपूर एक्स्प्रेस सकाळी आठ ऐवजी ९.३० वाजता, सीएसटी-नांदेड तपोवन एक्सप्रेस सकाळी सव्वासहा ऐवजी ९.०५ वाजता सुटणार आहे.
सहकार्याचे आवाहन
महिन्याभरापूर्वीच इगतपुरी रेल्वेस्थानकात नवीन रेल्वे मार्ग टाकण्यासाठी महिनाभर ब्लॉक घेण्यात आल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. रेल्वेच्या कामासाठी घेण्यात येणाºया ब्लॉकच्या काळात प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.