रेल्वे कामगारांचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 12:50 AM2017-09-29T00:50:40+5:302017-09-29T00:50:57+5:30
कर्षण मशीन कारखानामधील कंत्राटी कामगारांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याच्या निषेधार्थ रेल्वे ठेका मजदूर युनियनच्या वतीने गुरुवारी प्रवेश द्वारासमोर काम बंद धरणे आंदोलन करण्यात आले.
नाशिकरोड : कर्षण मशीन कारखानामधील कंत्राटी कामगारांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याच्या निषेधार्थ रेल्वे ठेका मजदूर युनियनच्या वतीने गुरुवारी प्रवेश द्वारासमोर काम बंद धरणे आंदोलन करण्यात आले.
रेल्वे ठेका मजदूर युनियनच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कर्षण मशीन कारखाना प्रशासन कामगारा विरोधी धोरण राबवित आहे. गेल्या १५-२० वर्षांपासून कंत्राटी कामगार काम करीत असून, संबंधित ठेकेदार या कामगारांचे गेल्या तीन महिन्यांपासून पगार दिलेला नाही. तसेच कामगारांचा पीएफही जमा केला जात नाही. कारखाना प्रशासन संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालत आहेत. धरणे आंदोलनात रेल्वे ठेका मजदूर युनियनचे महामंत्री मलबारी, सल्लागार आनंद गांगुर्डे, नॅशनल रेल्वे युनियनचे सचिव भारत पाटील, रवींद्र बिडवे, अशोक भगत, एकनाथ भांगे, प्रवीण पवार, शंकर पवार, रोहित टाके, अमर सौदे, सुनील भडांगे, राहुल रूपवते, आकाश टाके, सुधीर रोकडे, विशाल कटारे, सुरेश जगताप, चेतन निवक आदि सहभागी झाले होते.