पावसाने उडवली दैना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 01:17 AM2018-06-08T01:17:08+5:302018-06-08T01:17:08+5:30
नाशिक : मान्सूनपूर्व पावसाच्या दुसऱ्याच सलामीने शहराच्या अनेक भागांत नागरिकांची तारांबळ उडाली. गुरुवारी मध्यरात्री शहराच्या विविध भागांत सुमारे अर्धा ते पाऊण तास मेघगर्जनेसह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले. पंचवटीत स्लॅब कोसळून तीन जण जखमी झाले, तर हुंडीवाला लेनसह मध्य नाशकात दुकानांमध्ये पाणी साचल्याने काही प्रमाणात नुकसान झाले.

नाशिकमध्ये अद्याप मान्सूनचे आगमन झालेले नाही मात्र, रोहिणीच्या नक्षत्रावर मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती. मुख्य पावसाळा सुरू होण्यासाठी आता बोटावर मोजण्याइतकेच दिवस शिल्लक असताना गुरुवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास पावसाने मेघगर्जनेसह हजेरी लावली. सुमारे अर्धा ते पाऊण तास झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले. रात्रीची वेळ असल्याने जनजीवनावर त्याचा फारसा परिणाम झाला नसला तरी अनेक भागात चिखल आणि गाळ झाला होता. मध्य नाशिकमधील बाजारपेठेतदेखील पाण्याचे पाट वाहीले. हुंडीवाला लेनमधील उतारावरील भागातून आलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे अनेक दुचाकी पडल्या, तर तीन ते चार दुकानांने अगदी रस्त्यालगत असल्याने त्यांचे विशेषत: कापड दुकानदारांचे नुकसान झाले. आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसानंतर आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झाला आहे. अग्निशमन दलाला झाडे पडलेल्या ठिकाणी धाव घ्यावी लागली, तर हुंडीवाला लेन येथे चिखल व गाळ साचल्याने अग्निशमन दलास कळविताच सकाळी साडेनऊ वाजेच्या आत परिसरात स्वच्छता करण्यात आली. वीज यंत्रणा पूर्णपणे कोलमडलीमध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरासह ग्रामीण भागातील वीजयंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून गुरुवारी दुपारपर्यंत अनेक ठिकाणी वीजदुरुस्तीची कामे सुरू होती. नाशिक शहर-१ आणि शहर-२ मधील जवळपास सर्वच ठिकाणी वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. काल रात्री खंडित झालेला वीजपुरवठा दुसºया दिवशी दुपारी पूर्ववत झाला तर सायंकाळी पुन्हा वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला.