पाऊस आला अन् सुरु झाली स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 09:23 PM2018-08-18T21:23:33+5:302018-08-18T21:23:55+5:30
या वर्षातील पावसाळ्याचे तीन महीने संपत आले तरीही न्यायडोंगरी गावात एकदाही असा पाऊस पडलेला नव्हता गुरुवारी मात्र अचानक बऱ्यापैकी पाऊस सुरु झाला .ग्रामस्थांनी पावसाचे मोठ्या जल्लोषात स्वागत करीत आंनद घेतला.
न्यायडोंगरी : या वर्षातील पावसाळ्याचे तीन महीने संपत आले तरीही न्यायडोंगरी गावात एकदाही असा पाऊस पडलेला नव्हता गुरुवारी मात्र अचानक बऱ्यापैकी पाऊस सुरु झाला .ग्रामस्थांनी पावसाचे मोठ्या जल्लोषात स्वागत करीत आंनद घेतला. प्रत्येकाच्या घरांच्या छतावरील पानी खाली ओघळू लागताच प्रचंड पाणी टंचाईने त्रस्त झालेले न्यायडोगरीकर मिळेल त्या भांडयामध्ये छताचे पानी साठऊ लागले . जनु काही पाणी साठविन्याची स्पर्धाच लागली की काय असे चित्र संपूर्ण गावात दिसत होते . कही महिलांनी तर संधी साधुन भांडे व कपडे धुवून घेतले. पुन्हा पाणी मिळेल की नाही अशीच सर्वांची भावना होती. कारण गेल्या तीन महीन्यांपासूनसर्वांना पाणी विकत घ्यावे लागत होते. त्यात वापरा साठीचे पानी पन्नास रूपयांना दोनशे लीटर तर पिण्याचे एक रूपयास एक लीटर असा भाव मोजावा लागत होता. चारच दिवसांपूर्वी पाणी विक्र ेत्यांनी भाव वाढीची घोषणा करु न सर्वाना धडकी भरविली होती. असे असतानाच पाऊस सुरु झाल्याने प्रत्येकाने पाण्याचा एक थेंबही वाया जाऊ न देता पूर्ण पाण्याचा उपभोग घेतला . दररोज ५० ते १०० रु पयांचे पाणी विकत घ्यावे लागत होते. शोधून पाणी उपलब्ध करावे लागत होते . एकच दिवस पडलेला पाऊस पुन्हा येतो की नाही याची शास्वती कोणीही देऊ शकत नाही म्हणूनअसेल तेवढी रिकामी भांडी पाण्याने भरूनच घेतले. दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे त्यामुळे शेतकरी सह नागरिक चिंतेत दिसत आहे.