पावसाने पिक गेले वाहून...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 05:42 PM2020-09-10T17:42:50+5:302020-09-10T17:49:27+5:30
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील कोंशिबे येथे जोरदारपाऊस पडल्याने फळधारणा झालेले टमाटा पिक व भाताचे पिक पूर्णपणे वाहून गेल्याने शेतकरी वर्गाचे तोंडाचे पाणी पळाले आहे.
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील कोंशिबे येथे जोरदारपाऊस पडल्याने फळधारणा झालेले टमाटा पिक व भाताचे पिक पूर्णपणे वाहून गेल्याने शेतकरी वर्गाचे तोंडाचे पाणी पळाले आहे.
अनेक समस्या व संकटाचा सामना करीत खरीपांच्या हंगामासाठी कंबर कसली होती. अगोदर रोपे मिळत नसल्याने कशीबशी रोपे उपलब्ध करून हे पिक घेण्यासाठी बळीराजांने विविध बँकांचे कर्ज, सोसायटी, हात उसनवारी व मिळेल त्या ठिकाणाहून कर्ज घेऊन भांडवल उपलब्ध गेले. परंतु अचानक झालेल्या पावसाने कोंशिबे येथील अनिल सातपुते या शेतकरी बांधवाचे पुर्ण तयार झालेले टमाटा पिकं, लोखंडी तार, उभे केलेले बांबू व भाताचे पुर्ण पिक वाहून गेले.
सातपुते यांनी टमाटा पिक उभे करण्यासाठी खुप मेहनत घेऊन शेवटी भर पावसात पुर्ण तयार झालेली टमाटा पिक पाण्यात वाहात असतांना डोळ्यातून अश्रू वहात होते. या पावसाने जवळ जवळ अंदाजे ४ ते ६ लाख रूपयापर्यंत नुकसान झाले असुन फक्त झालेले नुकसान पहाण्यासाठी तलाठी येऊन गेले, परंतु संबंधित विभागाच्या कोणत्याही आधिकाऱ्याने साधी हजेरी सुध्दा लावली नसल्याने शेतकरी वर्गामध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
१) निसर्गाने शेतकरी वर्गाचे होते च नव्हते करून टाकले.
२) या आपत्तीमुळे शेतकरी वर्गाच्या जखमेवर मीठ चोळल्याची स्थिती निर्माण झाली.
३) पुर्ण पिकांची काही क्षणात वाताहत लागली.
४) जेवढे भांडवल होते ते पुर्ण टमाटा व भातासाठी लावले. आता जवळ एक फुटकी कवडी सुध्दा शिल्लक न राहिल्याने हे शेतकरी कुटुंब पुर्णपणे हतबल होऊन गेले आहे.
टमाटा व भाताचे पिक घेण्यासाठी मिळेल त्या ठिकाणाहून कर्ज घेऊन भांडवल उपलब्ध केले. व तारे वरची कसरत करून हे पिक पुर्ण तयार झालेले असतांना ते पावसाच्या पाण्यात वाहात असतांना पाहून अतिश्य दु:ख झाले. त्यामुळे मी पुर्ण खचून गेलो आहे. शासनाने याची दखल घेऊन आम्हाला भरपाई द्यावी.
- अनिल सातपुते, नुकसानग्रस्त शेतकरी, कोशिंबे.