पावसाने पिकांसह हातपंप गेला वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 04:19 PM2020-09-10T16:19:58+5:302020-09-10T16:21:10+5:30
अभोणा : गेल्या रविवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने चिंचोरे (ता.कळवण) शिवारातील शेतकऱ्यांच्या शेता जवळून वाहणाºया नाल्याचे मोठया प्रमाणात पाणी आल्याने शेतातील कोथिंबीर,टोमॅटो पिकासह हातपंपही वाहून गेला. शेतात दगड-गोटे वाहून आल्याने संपूर्ण शेतीही उध्वस्त झाली आहे.
अभोणा : गेल्या रविवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने चिंचोरे (ता.कळवण) शिवारातील शेतकऱ्यांच्या शेता जवळून वाहणाºया नाल्याचे मोठया प्रमाणात पाणी आल्याने शेतातील कोथिंबीर,टोमॅटो पिकासह हातपंपही वाहून गेला. शेतात दगड-गोटे वाहून आल्याने संपूर्ण शेतीही उध्वस्त झाली आहे. विनोद चव्हाण यांनी यंदा एक एकर क्षेत्रामध्ये कोथंबीर तसेच टोमॅटोची लागवड केली होती. हाताशी आलेले पिक त्यातच चांगला मिळत असलेला दर यामुळे अपेक्षा उंचावल्या होत्या. पावसाने क्षणात होत्याचे नव्हते केले. गेल्या चार पाच वर्षापासून शेतकरी दरवर्षी अशा प्रकारे होत असलेल्या नुकसानी बाबत तसेच ही समस्या कायमची सोडविण्यासाठी नाल्याच्या धक्क्याची उंची वाढविण्याची सातत्याने मागणी करत आहे. सबंधित यंत्रणे कडून दुर्लक्ष केले जात असल्याचे चव्हाण यांचे म्हणणे आहे.महागडी बियाणे,रासायनिक खते,औषधांची
फवारणी यासाठी मोठया प्रमाणावर खर्च करून,हाती आलेले पीक डोळ्यादेखत वाहून गेल्याने नुकसान भरपाई मिळावी. ही समस्या कायमची सोडविण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.याबाबत आमदार नितीन पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे विनोद चव्हाण यांचेसह शेतकºयांनी सांगितले.