शिक्षण राज्यमंत्र्यांसमोर नाशिकच्या पालकांकडून तक्रारींचा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:11 AM2021-07-18T04:11:39+5:302021-07-18T04:11:39+5:30
नाशिकच्या पालकांकडून प्राप्त तक्रारींवर शिक्षण विभागातील अधिकारी कसूर करीत असल्याचा आरोप पालकांनी केला असून मुजोर खाजगी शिक्षण संस्थांना पाठीशी ...
नाशिकच्या पालकांकडून प्राप्त तक्रारींवर शिक्षण विभागातील अधिकारी कसूर करीत असल्याचा आरोप पालकांनी केला असून मुजोर खाजगी शिक्षण संस्थांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही पालकांनी केली. नाशिक पॅरेंट्स असोसिएशनच्या माध्यमातून पालकांनी बच्चू कडू यांच्यासमोर तक्रारींचा पाढा वाचल्यानंतर बच्चू कडू यांनी सर्व तक्रारींवर १५ दिवसांत कारवाईचे आदेश दिले आहेत. यात मुजोर व नफेखोर शिक्षण संस्थांचा मनमानी कारभार, अवाजवी फी वसूल करून पालकांची केलेली लूट आदी विषयांची चौकशी करून आर्थिक जमा-खर्चाचे हिशोब व ऑडिट तपासणी पंधरा दिवसांत करण्याचे आदेशही त्यांनी या वेळी दिले. या वेळी पॅरेंट्स असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष नीलेश साळुंखे, उपाध्यक्ष प्रदीप यादव, सुयश पाटील, रंजीत राजपूत व पालक हरीश वाघ आदींनी पालकांच्या समस्या शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या समोर मांडल्या.