सुरगाणा तालुक्यातील पिकांचे पावसाने नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 10:58 PM2019-10-31T22:58:06+5:302019-10-31T22:58:18+5:30
सुरगाणा : परतीचा पाऊस जोरदार वाऱ्यासह बरसल्याने पिकांचे नुकसान झाल्याने पावसानेच दिले आणि पावसानेच ओरबाडून नेले असे म्हणण्याची वेळ आली आहे.
सुरगाणा : परतीचा पाऊस जोरदार वाऱ्यासह बरसल्याने पिकांचे नुकसान झाल्याने पावसानेच दिले आणि पावसानेच ओरबाडून नेले असे म्हणण्याची वेळ आली आहे.
परतीचा पाऊस परतण्याऐवजी दररोज जोरदार वाºयासह अर्धा एक तास बरसत आहे. पावसाच्या तडाख्यामुळे भात, नागली, वरई आदी हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले. तालुक्यातील उंबरठाण, पळसन, बाºहे, बोरगाव, खुंटविहीर, पिंपळसोंड, माणी, हट्टी आदी परिसरातील विविध प्रकारचा उभा भात आडवा झाला तर नागलीचे देखील नुकसान झाले आहे. काही ठिकाणी कापणीवर आलेल्या भाताचे दाणे जोरदार वारा व पावसामुळे गळून पडल्याने तर काही ठिकाणी भातावर रोग पडल्याने बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. नुकसान झालेल्या ठिकाणी प्रशासनाने पीक पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कळवण व सुरगाणा तालुक्यात परतीच्या पावसामुळे भात, नागली आदी पिकांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी भातावर रोग पडला आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांना नुकसान ंभरपाई मिळावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची प्रतिक्रिया आमदार नितीन पवार यांनी दिली.