येवला तालुक्यात पावसाने मूग पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 07:36 PM2020-08-26T19:36:50+5:302020-08-27T02:42:59+5:30
येवला : तालुका परिसरात सुरू असणाºया संततधार पावसामुळे खरीप पिके धोक्यात येत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या मूग पिकाला कोंब फुटले असून शेंगा झाडावरच खराब होत आहेत. अनकाई येथील दयाराम भिडे या शेतकºयाने खराब झालेल्या उभ्या मूग पिकात चरण्यासाठी जनावरे सोडली.
लोकमत न्यूज नेटवर्क

सातत्याने सुरू असणाºया संततधार पाऊस, यामुळे वातावरणातील झालेला बदल खरीप पिकांच्या मुळाशी येत आहे. पिकांवर मोठ्या प्रमाणात अळी, बुरशी व किडीचा प्रार्दुभाव होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. पिक वाचवण्यासाठी औषध फवारणीवर मोठ्या प्रमाणात खर्च होवून ही पिक नुकसान थांबत नसल्याने अनेक शेतकºयांनी आपले मूग पिक उपटून टाकले. काहींनी तर पिकात जनावरे चरण्यासाठी सोडली तर काहींनी पिक नांगरून टाकले. अनकाई येथील भिडे यांनी एक एकरात मुगाचे पीक घेतले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मुगाचे पीक पूर्णपणे खराब झाले. हतबल झालेल्या या शेतकºयावर उभ्या मुग पिकात जनावरे चरण्यास सोडून देण्याची वेळ आली.