त्र्यंबकला तासभर पाऊस; वीज गायब

By Admin | Published: May 18, 2014 07:57 PM2014-05-18T19:57:14+5:302014-05-18T23:47:26+5:30

त्र्यंबकेश्वर : शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास बेमोसमी पावसाचे आगमन झाले. तासभर चांगला पाऊस पडून रस्त्यावरील खड्डे पावसाने भरले. मुख्य रस्ता सोडून अन्य ठिकाणी चिखल झाला. अनेक भागांत गेल्याने नागरिकांचे हाल झाले. उष्णतेने सर्वच हैराण झाले. त्यातही डासांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढल्याने कोठे जावे कोठे बसाव, बाहेर पाऊस त्यामुळे केव्हा एकदा वीज येते असे वाटत होते. यात्रेकरूंची तर अत्यंत गैरसोय झाली.

Rain for an hour; Power disappears | त्र्यंबकला तासभर पाऊस; वीज गायब

त्र्यंबकला तासभर पाऊस; वीज गायब

googlenewsNext

त्र्यंबकेश्वर : शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास बेमोसमी पावसाचे आगमन झाले. तासभर चांगला पाऊस पडून रस्त्यावरील खड्डे पावसाने भरले. मुख्य रस्ता सोडून अन्य ठिकाणी चिखल झाला. अनेक भागांत गेल्याने नागरिकांचे हाल झाले. उष्णतेने सर्वच हैराण झाले. त्यातही डासांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढल्याने कोठे जावे कोठे बसाव, बाहेर पाऊस त्यामुळे केव्हा एकदा वीज येते असे वाटत होते. यात्रेकरूंची तर अत्यंत गैरसोय झाली.
गेल्या महिना-पंधरा दिवसात जिल्‘ात अवकाळी पावसाने उच्छाद मांडला आहे. त्र्यंबकला किरकोळ थेंबा व्यतिरिक्त त्र्यंबकला पाऊस पडला नव्हता. आज मात्र त्र्यंबकला सुमारे तास-दीडतास बर्‍यापैकी पाऊस पडला. तत्पूर्वी जोरदार वारे, विजा चमकू लागल्या आणि यात वीज गायब झाली. संबंधित अधिकार्‍याला विचारले असता १० ते १५ मिनिटात वीज येईल आणि त्याप्रमाणे झालेही तसेच मात्र केवळ १० मिनिटे विज सप्लाय होता. आणि त्यानंतर जी वीज गेली ती लवकर येईना, अधिकार्‍यांना पुनश्च विचारले तर अंबड लाईन फॉल्ट झाल्याचे समजते. काही वेळात प्रजापती आणि त्यांच्या कर्मचार्‍यांनी भर अंधारात पाटपीट करून फॉल्ट शोधला. आणि सर्वांना वीज उपलब्ध करून दिली.
तथापि अंधारामुळे परगावाहून आलेल्या भाविकांची तारांबळ उडाली. एकाएकी पाऊस आल्याने सर्वांची पळापळ झाली. दर्शन कोठे करावे, कोणाच्या घरी पुजेला जायचे आहे ते कळेना अशी सर्वांची गत झाली. घरात उष्मा आणि डास तर बाहेर पाऊस. पाऊस थांबला तर अंधाराचे साम्राज्य. दरम्यान बर्‍याचजणांचे घरांची बांधकामे सुरू आहे. यासर्वांना धावपळ करावी लागली. (वार्ताहर)

Web Title: Rain for an hour; Power disappears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.