पुढील चार दिवस पावसाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 10:50 PM2020-10-03T22:50:07+5:302020-10-04T01:10:48+5:30
नाशिक : मागील तीन दिवसांपासून शहराच्या कमाल तापमानामध्ये वाढ होताना दिसत असून नाशिककर वाढत्या उकाड्याने हैराण होत आहे. दरम्यान, शुक्रवारी दुपारी शहराला पावसाने जोरदार तडाखा दिल्या होता. शनिवारी (दि.3) पुन्हा संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास मध्यम सरींचा शहर व उपनगरांमध्ये वर्षाव झाला. पुढील चार दिवस दुपारनंतर शहरात सोसाट्याच्या वा?्यासह पावसाची वर्दी राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

शनिवारी सकाळपासूनच आकाश स्वच्छ निरभ्र होते सूर्यप्रकाशही लख्ख स्वरूपामध्ये पडला होता मात्र दुपारनंतर शहरातील काही भागांमध्ये अचानकपणे ढगाळ हवामान तयार झाले तसेच हे माणसा अल्प 6 सिडको ही झाला त्यानंतर पुन्हा ऊन सावलीचा खेळ सुरू झाला आकाशात झालेली ढगांची गर्दी अधून-मधून डोकावणारा सूर्यप्रकाश असा लहरी निसर्गाचा खेळ पहावयास मिळाला. दुपारच्या उकाड्यामुळे नाशिककर घामाघूम झाल्याचे दिसले. मात्र, सायंकाळी साडेसहावाजेनंतर थंड वारा सुटला त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन पावसाचे आगमन झाले. दरम्यान, हवामान विभागाने पुढील चार दिवस दुपारी व सायंकाळी परतीचा पाऊस शहर व परिसरात हजेरी लावणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. शहरातील कमाल तापमान ३२.६ तर किमान २१.२ अंश सेल्सियस इतके नोंदविले गेले.. सायंकाळी पंचवटी, जुने नाशिक, सिडको, गंगापूररोड, पाथर्डी, मेरी, म्हसरुळसह अन्य भागात पावसाने हजेरी लावली.