त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाचे पुनरागमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 10:24 PM2019-07-25T22:24:02+5:302019-07-25T22:24:43+5:30
वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : तालुक्यासह परिसरात बुधवारी मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार पुनरागमन केले. पावसाच्या संततधारेमुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा दिला आहे.
वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : तालुक्यासह परिसरात बुधवारी मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार पुनरागमन केले. पावसाच्या संततधारेमुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा दिला आहे.
पके लावणीला असताना गेल्या दोन आठवड्यां पासून पाठ फिरविल्याने नागली, वरई पिकांची लावणी खोळंबली होती. नागली, वरई या पिकांची लावणी करण्यासाठी पावसाच्या संततधारेची गरज असते. त्यामुळे ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण आहे. या पावसाने तालुक्यातील बळीराजाला मोठा दिलासा दिला असून, तालुक्यातील वातावरणात शेतीसाठी योग्य आहे, शेतीच्या कामांना वेग आला आहे; परंतु शेतीला मजूर मिळत नसल्याने मोठे हाल होत आहे.
ग्रामीण भागात शेतीसाठी मजुरांचा रोज हा दोनशेहून अडीचशे झाला आहे. पुढे आता तीनशे,
परंतु सगळ्या शेतकऱ्यांची कामे
एका वेळेत आल्याने मजुरांची
टंचाई निर्माण झाली आहे. वेळुंजे, गोरठाण वाघेरा येथे शेतीसाठी बाहेरगावाहून मजूर आणावे लागत आहे.
त्यांचा ने-आण करण्याचा अतिरिक्त खर्च शेतकºयांवर पडत आहे. एकूणच काय तर मजुरांना सुगीचे दिवस आले आहे. बुधवारपासून पावसाच्या संततधारेने गणपत बारी येथे रस्त्यावरील डोंगराने आपली जागा सोडली तो दगड थेट रस्त्यावर आल्याने रस्त्याने जात असलेल्या चारचाकी कार गाडीवर दगड आदळला व गाडीचे थोडक्यात नुकसान झाले आहे, सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.