मोठ्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात पाऊस परतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 11:07 PM2017-08-20T23:07:00+5:302017-08-21T00:21:30+5:30

मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शनिवारी रात्रीपासून जिल्ह्यात दमदार हजेरी लावल्याने पाण्याअभावी करपू लागलेल्या पिकांना काहीसे जीवदान मिळाले असून, बळीराजाच्या चेहºयावर समाधान दिसू लागले आहे. शनिवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस रविवारी दिवसभर सुरू होता. जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबक या तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. निफाड, येवला, सटाणा, दिंडोरी, पेठ या तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. पिके ऐन बहरात आल्यानंतर पावसाने ओढ दिल्याने हाती आलेले पीक जाते की काय याची चिंता शेतकºयांच्या चेहºयावर दिसत होती.

 The rain returned to the district after a huge anticipation | मोठ्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात पाऊस परतला

मोठ्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात पाऊस परतला

Next

नाशिक : मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शनिवारी रात्रीपासून जिल्ह्यात दमदार हजेरी लावल्याने पाण्याअभावी करपू लागलेल्या पिकांना काहीसे जीवदान मिळाले असून, बळीराजाच्या चेहºयावर समाधान दिसू लागले आहे. शनिवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस रविवारी दिवसभर सुरू होता. जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबक या तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. निफाड, येवला, सटाणा, दिंडोरी, पेठ या तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. पिके ऐन बहरात आल्यानंतर पावसाने ओढ दिल्याने हाती आलेले पीक जाते की काय याची चिंता शेतकºयांच्या चेहºयावर दिसत होती. पावसाने हजेरी लावल्याने पोळ्याचा आनंद द्विगुणित झाला आहे.
येवल्यात पावसाची दमदार हजेरी
येवला : गेल्या कित्येक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने तालुक्यामध्ये दमदार हजेरी लावली. पोळा या सणाच्या पूर्वसंध्येलाच तालुक्यात सर्वत्र कमीजास्त प्रमाणात पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. उभ्या पिकांना असलेली गरज पुर्ण झाली असली तरी विहिरींना पाणी येण्यासाठी मोठ्या आणि दमदार पावसाची अपेक्षा शेतकºयांना  आहे. येवला शहरामध्ये सोशल मीडियावर शहरातील रस्त्यातील खड्डे ओव्हरफ्लो अशा पोस्ट फिरवून शहरातील रस्त्याच्या दुरवस्थेवर ताशेरे ओढले जात होते. रविवारी पहाटेपासून कमीजास्त प्रमाणात येणारा पाऊस सकाळी ७ नंतर हळूहळू जोर पकडू लागला तर दुपारी पावसाने चांगलाच जोर धरला होता. येवला तालुक्यामध्ये आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या १९ दिवसात केवळ २० मिमी पाऊस पडला असल्याने शेतकरी चिंतेत होता. रविवारी झालेल्या पावसाची आकडेवारी आली नसली तरी निश्चितच आॅगस्टची सरासरी ओलांडली जाईल असे चित्र दिसत आहे.
डांगसौंदाणे : डांगसौंदाणेसह परिसरात दमदार पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. पाण्याअभावी करपू लागलेल्या पिकांना या पावसामुळे नवसंजीवनी मिळाली आहे. परतीच्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा पावसामुळे आनंदित झाला आहे. परिसरात रिमझिम पावसाने शनिवारी रात्री व रविवारी हजेरी लावली आहे. मुसळधार जरी नसला तरी या पावसाने सर्वच पिकांना जीवदान मिळाले आहे. परिसरात अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. बळीराजाला पावसाने चांगलीच हुलकावणी दिल्याने पेरणी झालेल्या क्षेत्रातील पिके पावसाअभावी करपू लागली होती. त्यामुळे बळीराजाच्या चेहºयावर चिंतेचे ढग स्पष्ट दिसू लागले होते. पावसाने लावलेल्या हजेरीमुळे शेतकºयांना दिलासा मिळाला  आहे. जेमतेम पावसावर पेरणी झालेली पिके उन्हाच्या तडाख्याने कोमेजू लागली होती. पावसामुळे जनावरांच्या चाºयाची चिंता थोड्या फार प्रमाणात का होईना कमी होणार आहे. बागलाणच्या पश्चिमपट्ट्यातील बहुतांशी आदिवासी बांधवांचे मुख्य पीक हे भात व नागली असून, लागवडीनंतर दमदार पावसाच्या हजेरीशिवाय ही पिकेही आता कोमेजू लागल्यामुळे आदिवासी बांधवांच्या चेहºयावर चिंता दिसू लागली होती. पावसाने सगळीकडेच हजेरी लावल्याने या भागातील भात, नागली, बाजरी, मका या पिकांना जीवदान मिळाले आहे. आठ ते दहा दिवस असाच पाऊस सुरू राहिल्यास परिसरातील पाण्याची समस्या दूर होईल व विहिरीच्या पाणी पातळीतही वाढ होण्याची आशा बळीराजाने व्यक्त केली आहे.
पेठमध्ये रिमझिम
पेठ : राज्यभर पावसाचे पुनरागमन झाले असताना पेठ तालुक्यात मात्र गत १२ तासांपासून रिमझिम सुरू आहे. सर्वत्र ढगांनी आकाश झाकोळले असून गोळशी फाट्यापासून सावळघाटपर्यंत रस्ते धुक्यात हरवले आहेत.

Web Title:  The rain returned to the district after a huge anticipation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.