दिंडोरीत सलग दुसऱ्या दिवशीही पाऊस

By admin | Published: August 4, 2016 01:11 AM2016-08-04T01:11:02+5:302016-08-04T01:11:27+5:30

जनजीवन विस्कळीत : शेतातील माती वाहून गेल्याने नुकसान

Rain for the second consecutive day in Dindori | दिंडोरीत सलग दुसऱ्या दिवशीही पाऊस

दिंडोरीत सलग दुसऱ्या दिवशीही पाऊस

Next

 दिंडोरी: तालुक्यात मंगळवारी रात्री काही वेळेच्या विश्रांतीनंतर पावसाचा जोर कायम राहिल्याने सलग दुसऱ्या दिवशीही जनजीवन विस्कळीत राहिले असून एकीकडे धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाल्याची खुशी असताना शेतीचे लाखोंचे नुकसान झाल्याने नुकसानग्रस्त शेतकरी हवालिदल झाले आहेत.
गेल्या दोन दिवसांत सुमारे २०७ मिलीमीटर पाऊस होत अक्षरश: हाहाकार उडविला असून. पावसाने तालुक्याची वार्षिक सरासरी गाठली आहे नदी नाल्यांच्या काठ ची शेकडो एकर जमीन पिकांसह धुवून जात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे .पिकांमध्ये सर्वाधिक नुकसान शिमला मिरची, टोमॅटो पिकाचे झाले असून सोयाबीन, भुईमूग या पिकांचेही नुकसान झाले आहे. पिकाच्या नुकसानीचे पंचनामे होणार असले तरी पावसाने शेतातील हजारो ब्रास काळी मातीही पावसाने वाहून गेल्याने जमिनीचे नुकसान झाले आहे. पिकाचे नुकसान भरून काढता येईल मात्र जमिनीची झालेली धूप केव्हाच भरून येणारी नाही. अनेक शेतकरी कमालीचे चिंताग्रस्त झाले आहे.
पालखेड, करंजवन, वाघाड व पुणेगाव हि धरणे पूर्ण क्षमतेनी भरली असून ओझरखेड व तिसगाव धरणांनी साठी ओलांडन्याकडे वाटचाल सुरु केली आहे. झालेल्या पावसाने तालुक्यासह चांदवड, निफाड, येवला, मनमाड सह नगर मराठवाड्यातील परिसरातील नागरिक व शेतकरी कमालीचे समाधानी झाले असले तरी या पावसात तालुक्यातील अनेक घराची पडझड झाल्याने अनेकांचे घराचे छत्र हरपले आहे. पावसाने दोन नागरिकांचे बळी घेतले असून दोन नागरिक अजूनही बेपत्ता आहे.त्यांच्या शोधासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे मदत मागविण्यात आली आहे. काल परवा जी धरणे तिशी चाळीशीच्या आत होती ती एक दीड दिवसांत १०० टक्के पूर्ण झाली. असून शेतातील विहिरी, कुपानालीकांच्या पाणी साठयात मोठी वाढ झाल्याने आता पुठील वर्षाची चिंता मिटल्यासारखीच असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
शेती, घरे याच बरोबर तालुक्यातील अनेक रस्त्यांची तर अक्षरश: चाळण झाली. यात पुलांचेही मोठे नुकसान असून शेतातील शिवार रस्ते तर कमालीचे खराब झाले आहे. एकांदरीतच तालुक्यातील झालेल्या पावसाने धरण साठ्यात झालेली वाढ हि समाधान कारक असली
तरी या पावसाने शेतकरी व नागरिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे झालेला पाऊस हा ‘कही खÞुशी
काही गम’ असाच म्हणावा लागत आहे.
मिडकजाम येथे पाझर तलाव ओवरफ्लो होत अडीच एकर शेतीसह घराचे लाखोंचे नुकसान मडकीजाम शिवारातील संगाडीचा पाझर तलाव ओवरफ्लो होत त्याचे पाणी थेट जनार्दन वडजे ,पुष्पा वडजे यांच्या घराला वेढा मारत त्यांचे अडीच एकर शेतात घुसत सोयाबीन भुईमूग पिकांसह शेतातील पूर्ण माती वाहून गेली .घराला पाण्याने वेढा घेत त्याचेही नुकसान झाले यापूर्वी २००३ ला बंधारा फुटत तर २००८ ला ओवरफ्लो होत नुकसान झाले होते .तर सदर पाझर तलावाला गळती लागलेली असून त्यामुळेही नुकसान होत आहे आता पुन्हा नुकसान झाल्याने सदर शेतकरी हवालिदल झाले असून संपूर्ण नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
धामनवाडी येथे नाल्याचे पाणी शेतात घुसून मोठे नुकसान धामानवाडी येथील सुखदेव पगार यांचे शेतात नाल्या चा पुराचे पाणी घुसून द्राक्ष बाग व टोमॅटोचे मोठे नुकसान होत शेतातील माती पिकांसह वाहून गेली लोखंडेवाडी येथेही मोठे नुकसान लोखंडेवाडी येथे मनोहर गायकवाड यांचे शेतात पाणी येऊन शेतातील माती वाहून जात मोठे नुकसान झाले योगेश ऊगले यांचे कोथंबीर पिकाचे नुकसान झाले जानोरी येथे मोठे नुकसान जानोरी बाजार पटांगण परिसर हाँटेल घड्याल रिपेअर विक्र ी टपरी सह सहा दुकाने बानगंगा नदी पुरात वाहून गेल्या व गावातील विस्तवरील घरे भिंत पडून नुकसान झाले महाराष्ट्र जीवन प्रा पाच गाव पानी योजना व डिंफेस पानि पुरवठा करणारे योजनेचे नदीपात्राजवळील पाइप वाहून खेलेने .ओझर जानोरी जवलके पानि पुरवठा बंद झाला आहे शेतकरी वर्गाचे सोयाबिन भुईमुग टमाटे मिरची इत्यादी पिकांचे संपूर्ण नुकसान झाले संपत हरी घुमरे व राजेन्द्र तु घुमरे यांचे शेतात नाल्याचे पानि शेतातील मातिसह काहि भाग वाहून ट्रक्टरह वाहनाचे वशेतीचे नुकसान झाले यास सार्वजनिक बांधकाम विभागाचा हलगर्जीपना व दुर्लक्ष झाले असून संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी असी मागणी माजी पंचायत समीती सदस्य सुनील घुमरे यांनी केली आहे.योगेश वाघ यांच्या सिमला मिरचीचे मोठे नुकसान झाले तसेच द्राक्ष बागेचे झेंडू पिकाचे तसेच शेडचे नुकसान झाले
दिंडोरी येथे हि अनेक ठिकाणी शेतात पाणी घुसत शेतकर्यांचे नुकसान झाले.बाळू बोरस्ते,सतीश बॉंबले,दत्तू बोरस्ते आदींच्या टोमॅटो सिमला मिरची आदी पिकांचे नुकसान झाले.
खेडगाव येथील राजीव नगर मध्ये राहणारी श्रीमती कमलाबाई सीताराम पवार ह्याचे घर पडल्याने त्या स्वता जखमी झाल्या असून तीन शेळ्या मृत्युमुखी पडल्या आहे .
दिंडोरी येथे स्टेट बँक परिसरात सॉ मिल मध्ये पाणी घुसून मोठ्या प्रमाणात लाकडे वाहून गेली.श्रीराम कर्पे यांचे घरात पाणी घुसत संसार पयोगी साहित्यचे मोठे नुकसान झाले बाळासाहेब साठे यांच्या बांबू डेपोत पाणी घुसून बांबू वाहून जात नुकसान झाले.(वार्ताहर)
 

Web Title: Rain for the second consecutive day in Dindori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.