मालेगाव परिसरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊस
By admin | Published: October 27, 2015 10:26 PM2015-10-27T22:26:49+5:302015-10-27T22:27:30+5:30
जोरण परिसरात परतीच्या पावसाचे आगमन
मालेगाव : तालुक्यातील
काही गावांसह शहरात काल सायंकाळी पाऊस पडला. यामुळे रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
शहर व तालुक्यात गेल्या
दोन दिवसांपासून पाऊस पडत
आहे. काल सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात
होऊन शहरात अर्धा ते एक तास जोरदार पाऊस पडला. त्यानंतर उशिरापर्यंत तुरळक पाऊस
पडत होता.
यावेळी काही भागात
जोरदार वारा सुटल्याने अनेकांची घाबरगुंडी उडाली. त्यांच्यावर बचावासाठी आसरा शोधण्याची वेळ आली.
शहरात रविवार व सोमवार
असा दोन दिवस लागोपाठ
पाऊस पडला. त्यामुळे शहरवासीयांची उकाड्यातून
सुटका होण्यास मदत झाली आहे. या दोन दिवशी पावसाला सुरुवात होताच विद्युतपुरवठा खंडित झाला. त्यामुळे रहिवाशांचे विशेषत:
लहान मुले व वयोवृद्धांचे मोठे हाल झाले.
शहरात नवरात्रीला सुरुवात झाल्यापासून कायम वीजपुरवठा खंडित होत आहे. यात दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी वीजपुरवठा नसल्याने अंधारात
दसरा साजरा करावा लागला
होता. या दोन दिवसांत वीज
खंडित झाल्याने वीज वितरण कंपनीविषयी संताप व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)
जोरण परिसरात परतीच्या पावसाचे आगमन
जोरण : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात सोमवारी पावणेचार वाजता परतीच्या पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकरीवर्गाची तारांबळ उडाली. परिसरात मका पिकाची कापणी सुरू आहे. पावसाने डाळींब, द्राक्ष व अन्य पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे शेतात नक्की कोणते पीक घ्यावे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे. थोड्या प्रमाणात जगवण्यात आलेल्या डाळींब, द्राक्षबागांचे या परतीच्या पावसाने नुकसान होण्याची भीती शेतकरीवर्गाकडून व्यक्त होत आहे. परिसरातील शेतकऱ्यांपुढे असा प्रश्न पडला की, कोणत्या पिकाला शेतात पिकवता येईल व तसेच थोड्याफार प्रमाणात जगवलेल्या बागांच्या भरोशावर बँक,
सोसायटी व सावकारी अशा प्रकारे कर्ज घेण्यात
आले असून, परतफेड कशी करावी, असा प्रश्न
शेतकऱ्यांपुढे पडला आहे. तेल्या या रोगाने आक्र मण
केले व शेतकरीराजाने डाळींबबागा तोडण्यात आल्या व थोड्या प्रमाणात राहिल्या आहेत, तर परतीचा पाऊस, गारपीट, बेमोसमी होणारा पाऊस यामुळे शेतकरीराजा चिंतातुर झाला आहे. नुकतीच परिसरात मका कापणीस
सुरु वात झाली असून, परतीच्या पावसात जनावरांचा चारा पावसात भिजला गेला .