वणीला पावसाचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 09:06 PM2021-05-30T21:06:56+5:302021-05-31T00:45:53+5:30
वणी : परिसरात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत, तर काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याचे वृत्त आहे.
वणी : परिसरात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत, तर काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याचे वृत्त आहे.
सप्तशृंग गडावर पावसामुळे पाण्याचे तळे तयार झाले होते. उंच सखल भागातील पर्वत रांगामधील पावसाचे पाणी जमिनीकडे जात असतानाचे दृश्य दिसत होते. दरम्यान उपबाजारात सध्याच्या पावसाळी स्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक सुरू आहे. सकाळच्या सत्रात कांदा लिलाव व खरेदी विक्री प्रक्रीयेनंतर कांदा चाळीत साठवत असतानाच पाऊस आल्याने व्यापारीवर्गाची धांदल उडाली. सलग तीन दिवसांच्या पावसाच्या हजेरीमुळे प्रचंड आवक कांद्याची उपबाजारात झाली. दरम्यान पावसामुळे विजपुरवठा खंडीत झाला होता.