नांदगावी वादळी वाऱ्यासह पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:22 PM2021-06-28T16:22:27+5:302021-06-28T16:37:48+5:30

नांदगाव : शहरासह तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. सर्वत्र पाणीच पाणी झाले. सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसाने अवघ्या काही मिनिटात शेतात पाणी तुंबले. शेतातले बांध फुटून पाणी सैरावैरा रस्त्यावरून व नाल्यांमधून धावले.

Rain with strong winds at Nandgaon | नांदगावी वादळी वाऱ्यासह पाऊस

नांदगावी वादळी वाऱ्यासह पाऊस

googlenewsNext
ठळक मुद्देदरवाजा खिडकीतून व लहानमोठ्या फटीतून पाणी घरात घुसले.

नांदगाव : शहरासह तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. सर्वत्र पाणीच पाणी झाले. सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसाने अवघ्या काही मिनिटात शेतात पाणी तुंबले. शेतातले बांध फुटून पाणी सैरावैरा रस्त्यावरून व नाल्यांमधून धावले. विजांच्या लखलखाटासह घनगर्जनेसह पावासाला सुरुवात झाली. ४० मिनिटे पाऊस झाला. सर्वत्र पाणीच पाणी झाले. शहरातील व खेडे गावातील छोटे रस्त्यांवरून पाणी वाहत होते. काही ठिकाणी रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. गच्चीच्या पाइपात पाणी न मावल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरले. 


नांदगाव परिसरात शेतात तुंबलेले पाणी. (२८ नांदगाव २)
 

Web Title: Rain with strong winds at Nandgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.