पावसाने झोडपले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 12:38 AM2017-10-12T00:38:35+5:302017-10-12T00:38:59+5:30

नाशिक : गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहरात जोरदार पाऊस सुरू आहे. बुधवारी (दि.११) नाशिककरांना पावसाने चांगलेच झोडपले. दुपारी शहराच्या मध्यवर्ती भागासह विविध उपनगरांमध्ये पावसाला जोरदार सुरुवात झाली. शहरात मंगळवारी पावसाचा जोर कमी होता; मात्र बुधवारी सकाळपासून शहरात ढगाळ हवामान कायम असल्याने दुपारी तीन वाजेपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली. सुमारे दीड तास चाललेल्या पावसाने नाशिककरांची दैना उडविली. शहरासह उपनगरांमध्येही पावसाचे थैमान सुरू होते. सर्व परिसर जलमय झाला होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते.

Rain thundered ... | पावसाने झोडपले...

पावसाने झोडपले...

नाशिक : गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहरात जोरदार पाऊस सुरू आहे. बुधवारी (दि.११) नाशिककरांना पावसाने चांगलेच झोडपले. दुपारी शहराच्या मध्यवर्ती भागासह विविध उपनगरांमध्ये पावसाला जोरदार सुरुवात झाली.
शहरात मंगळवारी पावसाचा जोर कमी होता; मात्र बुधवारी सकाळपासून शहरात ढगाळ हवामान कायम असल्याने दुपारी तीन वाजेपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली. सुमारे दीड तास चाललेल्या पावसाने नाशिककरांची दैना उडविली. शहरासह उपनगरांमध्येही पावसाचे थैमान सुरू होते. सर्व परिसर जलमय झाला होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते.
दरम्यान, गंगापूर धरणातून मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास पाच हजार क्यूसेकचा विसर्ग गोदापात्रात करण्यात आला. दुपारी एक वाजेनंतर हा विसर्ग कमी करण्यात आला असला तरी गोदावरीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण शहरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे गोदावरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. गोदावरीवरील अहल्यादेवी होळकर पुलाखालून पुढे नदीपात्रात ६ हजार ५६० क्यूसेक पाण्याचा प्रवाह सुरू होता. गंगापूर धरणातून मंगळवारी रात्री बारा वाजता विसर्ग वाढविण्यात आला होता.
बुधवारी दुपारपर्यंत ५११६ क्यूसेक विसर्ग सुरू होता. गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने विसर्ग दुपारी एक वाजता ४५४५ क्यूसेक तर चार वाजता २८७४ क्यूसेकवर आणला गेला; मात्र शहरात चार वाजेपासून पावसाला पुन्हा जोरदार सुरुवात झाल्याने गोदावरीच्या पाण्याची पातळी वाढली होती. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊसबुधवारी सकाळी सहा वाजेपर्यंत त्र्यंबकला १२, गंगापूरला ११ तर कश्यपी ३८, गौतमी-गोदावरीच्या परिसरात ६९, अंबोली परिसरात ७४ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली. एकूणच गंगापूर धरण समूहातील गौतमी, कश्यपी, अंबोली या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसामुळे गंगापूर धरणात बुधवारी दुपारपर्यंत पाण्याची मोठी आवक सुरू होती. त्यामुळे मंगळवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेला ५००० क्युसेकचा विसर्ग बुधवारी दुपारपर्यंत कायम होता. मात्र, दुपारनंतर पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने विसर्गामध्येही कपात झाली.

Web Title: Rain thundered ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.