नांदूरशिंगोटे परिसरात पावसाच्या पाण्याने नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 04:14 PM2020-09-12T16:14:43+5:302020-09-12T16:25:19+5:30

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे परिसरातील शुक्र वारी (दि.११) सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने शेतीमालासह, रस्ते, घरे, वृक्ष आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने बळीराजाला दिलासा मिळाला असला तरी आतोनात अडचणीचा सामना करावा लागला आहे.

Rain water damage in Nandurshingote area | नांदूरशिंगोटे परिसरात पावसाच्या पाण्याने नुकसान

सानप वस्तीकडे जाणार्या रस्त्याची झालेली दुरावस्था.

Next
ठळक मुद्देमानोरी येथे गावातून सानप वस्तीकडे जाणारा रस्ता वाहून गेला

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे परिसरातील शुक्र वारी (दि.११) सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने शेतीमालासह, रस्ते, घरे, वृक्ष आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने बळीराजाला दिलासा मिळाला असला तरी आतोनात अडचणीचा सामना करावा लागला आहे.
तालुक्यातील मानोरी येथे गावातून सानप वस्तीकडे जाणारा रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी व ग्रामस्थांची गैरसोय झाली आहे. तसेच मानोरी - पळसखेडे रस्त्यालगत राहणार्या शशीकांत मधुकर म्हस्के यांच्या मातीच्या घराची भिंत पावसाने पडल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सांगळे वस्ती, सानप वस्ती आदींसह वाड्या-वस्तीवरील शिवार रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरात शुक्र वारी (दि.११) झालेल्या पावसाने हाहा:कार झाला. नळवाडी गावात असणाºया मारु ती मंदिराची पाठीमागील भिंत कोसळून नुकसान झाले आहे. तसेच मका, ऊस, डाळिंब, कांद्याचे रोपे आदींबरोबरच शेती पिकांचे नुकसान झाले आहे. जुणन वस्तीला राहणारे शांताराम माळी यांच्या कौलारू घराची पडझड झाली आहे. शिवसेना युवा नेते व पंचायत समितीचे माजी सदस्य उदय सांगळे यांनी भोजापूर खोºयात नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी मारु ती दराडे, माजी उपसरपंच सुदाम दराडे, राजेंद्र सहाणे, शिवाजी दराडे, गणपत दराडे, रावसाहेब दराडे, बाळासाहेब देशमुख, नामदेव देशमुख आदींसह शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Rain water damage in Nandurshingote area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.