जलकुंभामधून वर्षाव; हजारो लिटर पाण्याची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:30 AM2019-05-19T00:30:26+5:302019-05-19T00:30:42+5:30

जिल्ह्यासह अवघे राज्य दुष्काळात होरपळून निघालेले असताना गंगापूर धरणाचा जलसाठाही २० टक्क्यांपर्यंत येऊन पोहचला आहे. जिल्हा दौऱ्यावर असताना पालक सचिव सीताराम कुंटे यांनी आढावा बैठक घेत शहरात पाणीकपात करण्याचा सल्ला शुक्रवारी महापालिका, जिल्हा प्रशासनाला दिला; मात्र दुसºयाच दिवशी शनिवारी (दि.१८) सिडको परिसरातील खुटवडनगर भागातील महापालिकेचा जलकुंभ धो-धो भरून सुमारे अर्धा तास वाहत असल्याने पिण्याच्या पाण्याची नासाडी झाली.

Rain water harvesting; Loss of thousands of liters of water | जलकुंभामधून वर्षाव; हजारो लिटर पाण्याची नासाडी

जलकुंभामधून वर्षाव; हजारो लिटर पाण्याची नासाडी

Next
ठळक मुद्देएकीकडे पाणीकपातीची टांगती तलवार; दुसरीकडे अपव्यय सुरूच

सिडको : जिल्ह्यासह अवघे राज्य दुष्काळात होरपळून निघालेले असताना गंगापूर धरणाचा जलसाठाही २० टक्क्यांपर्यंत येऊन पोहचला आहे. जिल्हा दौऱ्यावर असताना पालक सचिव सीताराम कुंटे यांनी आढावा बैठक घेत शहरात पाणीकपात करण्याचा सल्ला शुक्रवारी महापालिका, जिल्हा प्रशासनाला दिला; मात्र दुसºयाच दिवशी शनिवारी (दि.१८) सिडको परिसरातील खुटवडनगर भागातील महापालिकेचा जलकुंभ धो-धो भरून सुमारे अर्धा तास वाहत असल्याने पिण्याच्या पाण्याची नासाडी झाली. वाया गेलेल्या हजारो लिटर पिण्याच्या पाण्याची जबाबदारी आता नेमकी कोणाची? महापालिका प्रशासन याबाबत कारवाई करणार का? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
राज्यात दुष्काळाने हाहाकार माजविला असून नाशिक जिल्ह्यातील अनेक गावे पाण्यावाचून तहानली आहेत. अशा परिस्थितीत सरकारपुढेही दुष्काळ निवारणासाठी उपाययोजना करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. नाशिक शहराची तहान भागविणाºया गंगापूर धरणाचा जलसाठाही वीस टक्क्यांवर आला आहे. गंगापूर धरण समूहाचा पाणीसाठाही कमालीचा घसरला आहे. यामुळे शहरावर पाणीकपातीचे संकट ओढावले आहे. पालक सचिवांनी शुक्रवारी घेतलेल्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जलसंपदा विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत महापालिकेला पाणीकपात करण्याचा सल्ला दिला.
दुसरीकडे महापालिका प्रशासनाचा गलथान कारभार शनिवारी चव्हाट्यावर आला. खुटवडनगर परिसरात दैनंदिन पाण्याचा पुरवठा करणारे जलकुंभाचा भरणा केला जात होता. यावेळी संबंधित यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे हा जलकुंभ संपूर्ण भरून धो-धो भरून वाहत होता. त्यामुळे हजारो लिटर पिण्याचे पाणी गटारीत वाहून गेले. महापालिकेच्या वतीने गेल्या दोन दिवसांपासून पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात असून, याच मनपाच्या गलथान व ढिसाळ नियोजनामुळे शनिवारी (दि.१८) दुपारी एक वाजेच्या सुमारास खुटवडनगर भागातील वृंदावननगर येथील मनपाच्या जलकुंभ भरून धो-धो वाहत होता. सुमारे अर्धातास वाहत असलेल्या जलकुंभातून हजारो लिटर पाणी वाया गेले.
घोटभर पाण्यासाठी जीव धोक्यात
नाशिक शहरापासून जवळच असलेल्या ग्रामीण भागात टिपूसभर पाण्यासाठी नागरिकांना अक्षरश: दिवस-रात्र एक करावी लागत आहे. घोटभर पाण्यासाठी महिला व लहान बालके जीव धोक्यात घालत असल्याचे विदारक चित्र बघावयास मिळत आहे. एकूणच पाण्याची होत असलेली नासाडी थांबविण्याची गरज आहे.
परिसरातून ये-जा करण्याºया नागरिकांनीदेखील मनपाच्या ही गोष्ट निदर्शनात आणून दिली. जलकुंभ ओव्हरफ्लो झाल्यानंतर कामकाज करणाºया कर्मचाºयाच्या लक्षात आल्यानंतर संबंधित कर्मचारी हा खुटवडनगर येथून अंबड गावातील पाण्याच्या जलकुंभाकडे जाऊन त्याने व्हॉल्व्ह बंद केले. यावेळात मात्र हजारो लिटर पाणी वाया गेल्याने याबाबत मनपाच्या कारभाराबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Web Title: Rain water harvesting; Loss of thousands of liters of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.