अशोकाचा ‘इंद्रधनुष्य’ सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 04:04 PM2020-02-07T16:04:02+5:302020-02-07T16:05:51+5:30

अशोका बिझनेस स्कूलच्या एमबीए महाविद्यालयात ‘इंद्रधनुष्य २०२०’ हा सांस्कृतिक कार्यक्र म नुकताच उत्साहात संपन्न झाला. यंदा ‘भारतीय सिनेमाचा प्रवास’ या संकल्पनेवर आधारित हा सांस्कृतिक कार्यक्र म साजरा झाला. भारतीय सिनेमाच्या सुरवातीपासून ते आतापर्यंतचा प्रवास यातून सादर करण्यात आला.

 'Rainbow' cultural program in Ashoka school excited | अशोकाचा ‘इंद्रधनुष्य’ सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात

अशोकाचा ‘इंद्रधनुष्य’ सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात

googlenewsNext
ठळक मुद्देभारतीय सिनेमाच्या सुरवातीपासून ते आतापर्यंतचा प्रवासबॉलिवूड, डिस्को, रेट्रो, लावणी असे विविध नृत्यप्रकार सादर

नाशिक : अशोका बिझनेस स्कूलच्या एमबीए महाविद्यालयात ‘इंद्रधनुष्य २०२०’ हा सांस्कृतिक कार्यक्र म नुकताच उत्साहात संपन्न झाला. यंदा ‘भारतीय सिनेमाचा प्रवास’ या संकल्पनेवर आधारित हा सांस्कृतिक कार्यक्र म साजरा झाला. भारतीय सिनेमाच्या सुरवातीपासून ते आतापर्यंतचा प्रवास यातून सादर करण्यात आला.
कार्यक्र माचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे कृषी आणि उद्योगाचे अध्यक्ष आशिष नहार, संस्थेचे अध्यक्ष अशोक कटारिया, संचालक डॉ. डी. एम. गुजराथी, प्रशासक डॉ. वासुदेव भेंडे व सल्लागार व्ही. आर. वेंकीटाचलम, सहाय्यक संचालक डॉ. नरेंद्र तेलरांधे, महाविद्यालयाचे प्रभारी संचालक डॉ. विकास गौंडारे आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थांनी बॉलिवूड, डिस्को, रेट्रो, लावणी असे विविध नृत्यप्रकार सादर करीत उपस्थितांना भारावून टाकले. तसेच यावेळी चालू शैक्षणकि वर्षात यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन जान्हवी मराठे, सौरभ तिवारी, तेजस्वी ठाकूर, सुमेधा देवकर, श्रुष्टि जैन , श्वेता चोरिडया, लविषा हेमनानी, पूजा सोंजे यांनी केले. तर आभार वंदना शर्मा यांनी मानले. यावेळी डॉ. रु पाली खैरे, डॉ. सरिता ढवळे, मनीषा भामरे, डॉ. वैभव भालेराव आदी उपस्थित होते.

Web Title:  'Rainbow' cultural program in Ashoka school excited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.