मालेगावसह परिसरात पावसाची रिपरिप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 12:11 AM2019-10-21T00:11:21+5:302019-10-21T00:35:52+5:30

मालेगाव शहर परिसरात शनिवारी (दि.१९) दुपारनंतर पावसाला पुन्हा सुरुवात झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. संततधारेमुळे शहरातील अनेक भागातील रस्त्यांवर पाणी साचून तळे निर्माण झाले होते. चालकांना या तळ्यांमधून वाहने चालविणे जिकिरीचे झाले होते.

Rainfall in the area including Malegaon | मालेगावसह परिसरात पावसाची रिपरिप

कृषीनगर कॉलनी भागात पावसाचे पाणी साचून जलमय झालेला परिसर.

Next
ठळक मुद्देनागरिकांचे हाल : शहरात ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचून रस्त्यांची दुरवस्था

मालेगाव : शहर परिसरात शनिवारी (दि.१९) दुपारनंतर पावसाला पुन्हा सुरुवात झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. संततधारेमुळे शहरातील अनेक भागातील रस्त्यांवर पाणी साचून तळे निर्माण झाले होते. चालकांना या तळ्यांमधून वाहने चालविणे जिकिरीचे झाले होते.
शहरातील सखल भागात पावसाचे पाणी साचून चिखल झाला असून, नागरिकांना चिखल तुडवत मार्गक्रमण करावा लागत आहे. गेल्या महिन्यात झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणच्या मोकळ्या तळघरांमध्ये पाणी जमा झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या पाण्यात डासांची उत्पत्ती होत असून, डेंग्यू- डायरिया यासारख्या साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. अनेक रुग्णांवर आजही खासगी दवाखान्यांमध्ये उपचार सुरू असून, त्यात पुन्हा ढगाळ हवामान आणि रिपरिप सुरू झाल्यामुळे रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
संततधार पावसामुळे शहरातील अनेक भागातील रस्ते उघडले आहेत. महापालिकेतर्फे डागडुजी करण्याचे काम सुरू आहे. मात्र पुन्हा पावसाचे आगमन झाल्याने हे खड्डे उघडे पडले आहेत. जुना आग्रा रोडवरून नव्या बसस्थानकाकडे जाणे वाहनधारकांना नकोसे झाले आहे. तालुक्यात खरिपाची पिके चांगले आले असताना रिपरिप पावसामुळे शेतात काढून ठेवलेली बाजरी व इतर पिके भिजुन शेतकऱ्यांचा हातचा घास हिरावून जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
पावसामुळे बळीराजा हतबल
अस्ताणे : अस्ताणेसह परिसरात यावर्षी पावसाने सुरूवातीला जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत असून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी शेतीच्या पीक काढणी कामात व्यस्त झाला असताना पुन्हा पावसाने रिपरिप सुरू केल्याने बळीराजा हतबल झाला आहे.
२५ वर्षानंतर प्रथमच असा पाऊस पहायला मिळाला. गेल्या दोन महिन्यांपासून सतत पाऊस पडत असल्याने शेतीचे कामे खोळंबली होती. एक दिवसाआड पाऊस पडत असल्याने शेतीच्या कामे शेतकºयांना करता येत नव्हती. त्यामुळे शेतात पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात गवत झाली आहे. पावसाने दहा ते पंधरा दिवसांपासून उसंत घेतल्याने शेतकरी आपले कामे आवरण्यात व्यस्त आहेत. एकदम कामे आल्याने कपाशी निंदणे, कांदे लागवड, कांदे निंदणी, मका कापणी अशी एकदमच कामे आल्याने मजुरांची तोलातोल करावी लागत आहे. काम जास्त असल्याने मजुरीही वाढली आहे. त्यामुळे शेतकºयांचे नाके नऊ येत आहे.
बाजरी, ज्वारी, मका कापणीसाठी ३०० रुपये प्रमाणे मजुर लागत आहे. पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु आले पिके कापणी करुन दुसºया पिकात उत्पादनाची कसर निघुन जाईल म्हणून गहु, हरभरा, कांदे लागवड करण्यासाठी शेतकरी शेत तयार करताना दिसत आहेत. दिवाळी जवळ आल्याने लवकरात लवकर कशी कामे आवली जातील याकडे शेतकºयांचा कल आहे; परंतु मजुरांअभावी शेतकºयांना स्वत:च लवकरच उठून आपली कामे करावी लागत आहे.
काही शेतकरी राममाने, पुरमेपाडा, कौळाणे अशा ठिकाणाहून मजुर आणत आहेत. त्याला प्रत्येकी दोनशे
रुपये रोज व मुकादमाला प्रत्येक मजुरामागे दहा रुपये आणि गाडीभाडे वेगळे लागत आहे. शेतीचे कामे जर वेळेत पूर्ण केली नाही तर मजुरीही जास्त लागतात. त्यामुळे मजुरवर्ग प्रत्येक वर्षी आपल्या मजुरी वाढवून घेत आहे. शेतकºयांना पर्याय नसल्याने पैसे
द्यावे लागत आहे. आता पुन्हा पावसाची उघडीप कधी मिळेल या चिंतेत शेतकरी आहेत.


परिसर हिरवागार
मालेगाव तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने खरिपाची पिके चांगली आली असून शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. पावसामुळे परिसर हिरवागार झाला असून जनावरांच्या चाºयाचा प्रश्नही सुटला आहे. दरम्यान शनिवारपासून पुन्हा पावसाने रिपरिप सुरू केल्यामुळे शेतकºयांनी काढून ठेवलेल्या बाजरीसह खरीप पिके भिजल्याने धोक्यात आली आहे. समाधानकारक पावसामुळे नद्या, नाले वाहत असून पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न सुटला आहे.ं
गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्याने शेतकºयांना अडचणींना सामोरे जावे लागतले होते. यावर्षी नदी, नाले, विहिरी, केटीवेअर पाण्याने भरलेले आहेत. त्यामुळे रब्बी पिके यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकरी घेताना दिसत आहेत.
ं४दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपल्याने शेतातील कामे लवकरात लवकर कशी होतील याकडे शेतकºयांचा कल आहे. कारण दिवाळीमुळे मजुरवर्ग काम करत नाही. त्यामुळे दिवाळीच्या अगोदरच कामे आटोपत आहे.
ं४मजुरवर्ग मोठ्या प्रमाणात ऊस तोडण्यासाठी बाहेरगावीही जात असतात. दिवाळी झाल्यानंतर अस्ताणे, राजमाने, लखाणे, टोकडे आदि गावातील मजुर हे ऊस तोडणीसाठी बाहेरगावी जात असतात.



त्यामुळे शेतीची कामे दिवाळीच्या अगोदरच शेतकºयांना आवरावी लागत आहेत. जादा दर देऊन शेतकºयांना मजुर आणावे लागत आहेत.



मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने गुरांच्या पाण्याचा व चाºयाचा प्रश्न मिटला आहे.

Web Title: Rainfall in the area including Malegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.