वीजप्रश्नी शेतकऱ्यांचा तक्र ारींचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 07:06 PM2018-10-15T19:06:17+5:302018-10-15T19:06:52+5:30

गोदाकाठ भागातील विजेच्या समस्यांनी शेतकरी त्रस्त झाले असून, खरीप हंगामातील पिके शेवटच्या टप्प्यात आहे. विजेच्या खोळंब्यामुळे पिकांना पाणी देता येत नसल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या असल्याच्या तक्र ारींचा पाऊस रामनगर येथे वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि वायरमन यांच्या उपस्थितीत आमदार अनिल कदम यांनी घेतलेल्या बैठकीत पडला.

Rainfall of farmers complaints of electricity questions | वीजप्रश्नी शेतकऱ्यांचा तक्र ारींचा पाऊस

वीजप्रश्नी शेतकऱ्यांचा तक्र ारींचा पाऊस

Next

कमी पर्जन्यमान झाल्याने थोडेफार पाणी विहिरींना आहे ते पिकांना देऊन खरीप हंगाम वाचविण्याचा शेतकरी प्रयत्न करत आहे, मात्र खंडित वीजपुरवठा, जळालेल्या डीपी, लोंबकळणाºया विद्युत तारा, निकामी डीपी आणि फ्यूज, लोडशेडिंग व्यतिरिक्त पूर्वसूचना न देता खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. अनेक शेतकºयांनी लेखी तक्र ार नोंदवली असूनही कार्यवाही होत नसल्याने लोकप्रतिनिधी आमदार कदम यांना शेतकरी सातत्याने दूरध्वनी करून विजेच्या तक्र ारी करत असल्याने शेतकरी आणि वीज वितरण कंपनीचे प्रशासकीय अधिकारी, परिसरातील लाईनमन, वायरमन यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
यावेळी शेतकºयांनी वीजपुरवठ्याबद्दल तक्र ारी केल्या. तालुक्यात भीषण दुष्काळ परिस्थितीमुळे शेतक-यांचे अतोनात हाल होण्याची शक्यता असल्याने थोड्याफार प्रमाणात खरीप हंगामातील पिके पदरात पाडून चार पैसे मिळण्याचे दिवस असल्याने विजेअभावी पिके करपत असतील तर सहन केले जाणार नाही. लोडशेडिंग व्यतिरिक्त वीजपुरवठा खंडित करू नका, खराब डीपी तत्काळ बदलून द्यावी, थकीत वीज बिलामुळे शेतकºयांना वेठीस धरून वीजपुरवठा खंडित करू नका, शेतकरी प्रचंड अडचणीत असून, सुरळीत वीजपुरवठा सुरू ठेवा, असा आदेश कदम यांनी दिला. यावेळी वीज वितरण कंपनीचे प्रभारी कार्यकारी अभियंता वट्टमवार , उपअभियंता पाटील, शाखा अभियंता कातकाडे यांसह शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Rainfall of farmers complaints of electricity questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.