नायगाव खोऱ्यात पावसाची हुलकावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:16 AM2021-09-22T04:16:45+5:302021-09-22T04:16:45+5:30

सिन्नर/नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खोऱ्यात अजूनही पावसाने हुलकावणी दिल्याने परिसरातील सर्वच नदी-नाले कोरडेठाक असल्यामुळे खरीप ...

Rainfall in Naigaon valley | नायगाव खोऱ्यात पावसाची हुलकावणी

नायगाव खोऱ्यात पावसाची हुलकावणी

Next

सिन्नर/नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खोऱ्यात अजूनही पावसाने हुलकावणी दिल्याने परिसरातील सर्वच नदी-नाले कोरडेठाक असल्यामुळे खरीप हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जल वाहिनीद्वारे खोऱ्यातील बंधारे भरण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने सर्वत्र जोरदार हजेरी लावत दाणादाण उडवली आहे. मात्र, सर्वत्र जोरदार पडणाऱ्या पावसाने सिन्नर तालुक्यातील उत्तर भागात हुलकावणी दिल्याने शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. सध्या पावसाळा शेवटच्या चरणात आला असतानाही परिसरातील सर्वच बंधारे अजूनही कोरडेठाक आहेत. त्यामुळे खोऱ्यातील खरिपाबरोबरच रबी हंगामाचे नियोजन कोलमडत असल्यामुळे शेतकरीवर्गात चिंता व्यक्त होत आहे.

अशा परस्थितीत नायगाव खोऱ्यातील गावांसाठी वरदान ठरत असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाची मुख्य जलवाहिनी गेलेल्या गावातील नद्यांमध्ये सोडून परिसरातील बंधारे भरून देण्याची मागणी शेतकरीवर्गाकडून केली जात आहे. जिल्ह्यातील दारणा व कडवा धरण सध्या ओहरफ्लो झाले आहे. त्यामुळे या धरणांमधून विसर्गही केला जात आहे. या सोडण्यात येत असलेल्या पाण्याचा उपयोग परिसरातील बांधारे भरण्यासाठी करावा.

दारणा धरणाच्या पाण्यावरच जीवन प्राधिकरणाची योजना सुरू आहे. याच योजनेच्या मुख्य जलवाहिनीद्वारे परिसरातील मोह-मोहदरी, ब्राह्मणवाडे, वडझिरे, जायगाव व देशवंडी आदी गावांतील बांधारे नद्यांद्वारे भरून देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते व पोलीस अधिकारी प्रदीप गिते, देशवंडीचे सरपंच दत्ताराम डोमाडे, उपररपंच सुमन कापडी, जायगाच्या सरपंच शालिनी दौंड, उपसरपंच दत्ता दिघोळे, वडझिरेच्या सरपंच सुनीता आंबेकर, उपसरपंच मनोहर बोडके, भास्कर ठोंबरे, पांडुरंग बोडके, ब्राह्मणवाडेचे सरपंच कैलास गिते, उपसरपंच सुमन गिते, मोहचे सुदाम बोडके आदींसह नायगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

(२१ नायगाव बंधारा)

-----------------------

सर्वत्र धुवाधार पडत असलेला पाऊस सिन्नर तालुक्यात अजूनही रुसलेला असल्यामुळे खरीप व रबीचा हंगाम वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा परस्थितीत ज्याप्रमाणे कडवाचे पूरपाण्याचे आवर्तन सोडून सिन्नरच्या पूर्व भागाला लाभ दिला याच धर्तीवर दारणाचे वाया जाणाऱ्या पाण्याने नायगाव खोऱ्यातील बंधारे जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीद्वारे भरून दिले, तर या परिसरातील खरीप व रबी हंगामास दिलासा मिळेल. यासाठी स्थानिक प्रतिनिधी व तालुका लोकप्रतिनीधींनी शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करावा.

-प्रदीप गिते, सामाजिक कार्यकर्ते, वडझिरे

210921\21nsk_19_21092021_13.jpg

२१ नायगाव बंधारा

Web Title: Rainfall in Naigaon valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.