नाशिक जिल्ह्यात पावसाने साधली गतवर्षाची बरोबरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 11:43 PM2020-07-17T23:43:41+5:302020-07-18T00:40:01+5:30

गेल्या महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात जिल्'ात सर्वदूर झोडपून काढत महिन्याची सरासरी ओलांडणाºया पावसाने नंतर जवळपास महिनाभर दीर्घ विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्याच्या दुसºया आठवड्यापर्यंत जिल्'ात ३७ टक्के पाऊस झाला होता, त्याचीच बरोबरी यंदाही साधली गेली आहे. त्यामुळे जून महिन्यात पेरणी केलेल्या पिकांचे भवितव्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे.

Rainfall in Nashik district is equal to last year | नाशिक जिल्ह्यात पावसाने साधली गतवर्षाची बरोबरी

नाशिक जिल्ह्यात पावसाने साधली गतवर्षाची बरोबरी

Next
ठळक मुद्देमहिनाभरापासून प्रतीक्षा : शेतकरी हवालदिल

नाशिक : गेल्या महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात जिल्'ात सर्वदूर झोडपून काढत महिन्याची सरासरी ओलांडणाºया पावसाने नंतर जवळपास महिनाभर दीर्घ विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्याच्या दुसºया आठवड्यापर्यंत जिल्'ात ३७ टक्के पाऊस झाला होता, त्याचीच बरोबरी यंदाही साधली गेली आहे. त्यामुळे जून महिन्यात पेरणी केलेल्या पिकांचे भवितव्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे.
गेल्या वर्षी पावसाने थेट जुलै महिन्यातच हजेरी लावल्यामुळे त्यानंतरच पेरण्यांना वेग आला होता. संपूर्ण जून महिना कोरडाच गेल्याने पेरण्याही उशिराने करण्यात आल्या. यंदा मात्र निसर्ग चक्रीवादळाने हवामानात अचानक बदल होऊन जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने झडी लावली होती. विशेष म्हणजे दुष्काळी तालुक्यांमध्येही समाधानकारक पाऊस झाल्यामुळे नदी, नाल्यांच्या पातळीत वाढ झाली होती. पावसाचे आश्वासक आगमन पाहता, शेतकºयांनी जूनच्या दुसºया आठवड्यापासून पीक पेरणीस सुरुवात केली, तर भात शेतीसाठी रोपे तयार करण्यास सुरुवात केली. हवामान खात्यानेही यंदा समाधानकारक पाऊस पडणार असल्याचे जाहीर केल्यामुळे शेतकºयांनी त्याच भरवशावर पेरणीला वेग दिला. पहिल्या पावसानंतर पेरणी केलेल्या मका, सोयाबीन, भुईमूग, बाजरी या पिकांमध्ये तण काढण्याचे काम सुरू आहे. नेमकी पिकांच्या वाढीसाठी पाण्याची गरज निर्माण झालेली असताना गेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे पिके धोक्यात आली आहेत.
गेल्या पंधरा दिवसांत सरासरी १२४.२ मिलिमीटर इतका म्हणजे जुलै महिन्याच्या सरासरीच्या ३६.७९ टक्के पाऊस झाला असून, गेल्या वर्षीदेखील याचदरम्यान जिल्'ात ३७.१९ टक्के पाऊस झाला
होता. त्यामुळे यंदा चांगल्या पावसाच्या भरवशावर पिके घेतलेल्या शेतकºयांमध्ये नाराजी पसरली आहे. कृषी खात्याच्या अधिकाºयांच्या म्हणण्यानुसार येत्या चार ते पाच दिवसात चांगला पाऊस झाला तर पिके तग धरण्याची शक्यता आहे, अन्यथा दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.
चालू महिन्यातील पर्जन्यमान
नाशिक -६१, इगतपुरी-५८०, दिंडोरी-२५, पेठ-१७२, त्र्यंबकेश्वर-१८३, मालेगाव- ८०, नांदगाव- १२४, चांदवड- ८७, कळवण-६२, बागलाण- १३०, सुरगाणा-१५६, देवळा-७५, निफाड-३२, सिन्नर-५०, येवला-४८ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला आहे.

Web Title: Rainfall in Nashik district is equal to last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.