पाटोदा परिसरात अवकाळी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 02:20 PM2018-03-19T14:20:08+5:302018-03-19T14:20:08+5:30
पाटोदा :- पाटोदा परिसरातील पाटोदा ठाणगावं पिंपरी कानडी व परिसरात रविवारी रात्री नऊ वाजता अवकाळी पावसाने वाऱ्यासह जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. पावसाने हजेरी लावल्याने शेतात कापून तयार असलेला कांदा झाकण्यासाठी शेतकºयांची चांगलीच तारांबळ उडाली . गेल्या चार पाच दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरणामुळे शेतकरी धास्तावलेला होता.आज दिवसभर परिसरात प्रचंड उकाडा निर्माण झाला होता. त्यामुळे शेतकरी वर्गाने पावसाचा अंदाज बांधला होता.सध्या शेतात उभ्या असलेल्या गहू, हरभरा, कांदा व कांदा बियाणांसाठी लागवड केलेल्या डोंगळा पिकास या अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे .सध्या पाटोदा परिसरात द्राक्ष खुडा सुरू असून बºयाच शेतकºयांची द्राक्ष काढणी बाकी असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकºयांनी या अवकाळी पावसाचा धसका घेतला आहे. तर डोंगळा पिकही अवकाळी पाऊस व वाºयाने शेतात आडवे होण्याची भीती शेतकरी वर्गाने व्यक्त केली आहे.
दिंडोरी तालुक्यात द्राक्ष , गहु पिकांचे नुकसान
तालुक्यात रविवारी सायंकाळी ७ :३० वाजेच्या सुमारास बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
तालुक्यातील खतवड, मोहाडी, पिंपळणारे, ढंकांबे, जानोरी , खडक सुकेने परिसरात बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने द्राक्ष, गहु , कांदा आदीसह भाजीपाला पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या तालुक्यात द्राक्ष खुडीचा हंगाम सुरू असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच तालुक्यात गहु सोंगणीसाठी सुरु वात झाली असून पावसामुळे गव्हाचे मोठे नुकसान होत आहे. सोंगणीसाठी आलेला गहु बेमोसमी पावसाने भिजल्यामुळे व जमिनीवर आडवा पडल्यामुळे शेतकºयांना हाता तोंडाशी आलेला घास वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.