पेठ तालुक्यात पावसाचा जोर वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 02:48 PM2018-08-20T14:48:41+5:302018-08-20T14:48:52+5:30
पेठ - काहीशा विश्रांतीनंतर दोन दिवसापासून पेठसह तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून नद्या नाल्यांना पुर आला आहे.
पेठ - काहीशा विश्रांतीनंतर दोन दिवसापासून पेठसह तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून नद्या नाल्यांना पुर आला आहे. श्रावण महिन्यात पावसाचे प्रमाण कमी होईल असे वाटत असतांना त्याचे प्रमाण अधिकच वाढू लागले आहे. शेतकऱ्यांनी भात व नागलीची लावणी पुर्ण केली असली तरी संततधार पावसामुळे पिकांना खतांचा पुरवठा करणे अवघड झाले. खाचरात पाणी वाहत असल्याने खते वाया जात आहेत. एकीकडे शेतकरी दुष्काळाचा सामना करतांना दिसून येत असले तरी पेठ मध्ये मात्र शेतकरी पाऊस उघडण्याची वाट पाहत आहेत. या वर्षी सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाल्याने आधिच निकृष्ट दर्जाची कामे करून बोळवण केलेल्या रस्त्यांची दयानिय अवस्था झाली असून शासकिय इमारतींना गळती लागली आहे.