पावसाचा भात पिकाला फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 10:14 PM2020-08-28T22:14:57+5:302020-08-29T00:06:04+5:30

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील पावसाचे प्रमाण भातशेतीसाठी फायदेशीर असल्यामुळे उत्पादकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सध्या तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. हा पाऊस भात पिकाला फायद्याचा असल्याने उत्पादन वाढण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. मात्र इतर पिकांसाठी हा पाऊस धोक्याचा ठरत असल्याचे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. संततधार पावसामुळे टमाटा पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Rainfed rice crop benefits | पावसाचा भात पिकाला फायदा

पावसाचा भात पिकाला फायदा

Next
ठळक मुद्दे दिंडोरी : बळीराजाला तारणार; यंदा ‘इंद्रायणी’चे उत्पादन वाढणार

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील पावसाचे प्रमाण भातशेतीसाठी फायदेशीर असल्यामुळे उत्पादकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
सध्या तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. हा पाऊस भात पिकाला फायद्याचा असल्याने उत्पादन वाढण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. मात्र इतर पिकांसाठी हा पाऊस धोक्याचा ठरत असल्याचे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. संततधार पावसामुळे टमाटा पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात भात पिकाचे प्रमाण अधिक असते. या भागातील मोठा शेतकरीवर्ग भाताच्या विविध प्रकारचे बियाणे खरेदी करून लागवड करीत असतो. त्यात दप्तरी, भोगवती, लालकोर, महालक्ष्मी, कोळपी आदी स्वरूपाची बियाणे खरेदी करून लागवड करीत असतो; परंतु यंदा दिंडोरी तालुक्यातील पश्चिम पट्ट्याला भाताची नगरी म्हणून ओळखले जाते. यंदा या भागातील शेतकरीवर्गाने इंद्रायणी भाताला पसंती दिली आहे. हा भाग भातशेतीसाठी योग्य मानला जातो. त्यामुळे यंदा शेतकरीवर्गाने आपल्या शेतामध्ये इंद्रायणी भाताची रोपे निर्माण करून मोठ्या प्रमाणावर लागवड केली व सध्या स्थितीत इंद्रायणी भात पिकाची स्थिती उत्तम असल्याचे शेतकºयांनी सांगितले. पिकावर मावा, पिवळापणा तसेच इतर रोगांचा प्रादुर्भाव दिसत नसल्यामुळे बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
दिंडोरी तालुक्यात कुंडी वाफा, दलदल वाफा, जमीन पायरी, टप्प्यात वाफा पद्धतीने भात लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. यासाठी संततधार पावसाची गरज असते. सध्या दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात पावसाची रिपरिप सुरू असल्यामुळे भात पिकाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. पीक जोमात असल्याचे शेतकरी आनंदात आहे.

Web Title: Rainfed rice crop benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.