पावसाने दिंडोरी तालुक्यातील जन जीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 03:16 PM2020-09-20T15:16:33+5:302020-09-20T15:17:20+5:30

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या पावसाने जोरदार सुरूवात केल्याने शेतकरी वर्गाच्या भुवया उंचावल्या आहेत. टमाटा पिकाला हा पाऊस धोका दायक ठरणार असे चित्र निर्माण झाले आहे.

Rains disrupt life in Dindori taluka | पावसाने दिंडोरी तालुक्यातील जन जीवन विस्कळीत

पावसाने दिंडोरी तालुक्यातील जन जीवन विस्कळीत

Next
ठळक मुद्देलखमापूर : टमाटे पिकांना हादरा; शेतकरी वर्ग हतबल

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या पावसाने जोरदार सुरूवात केल्याने शेतकरी वर्गाच्या भुवया उंचावल्या आहेत. टमाटा पिकाला हा पाऊस धोका दायक ठरणार असे चित्र निर्माण झाले आहे.
श्निवारी(दि.१९) पावसाचे आगमन ढगांचा गडगडात व विजांचा कडकडाटाने झाले. अगोदर मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडल्या परंतु रात्री सात नंतर जोरदार पावसाला सुरु वात झाली. त्यात दिंडोरी, लखमापूर, ओझे, करजंवण, अवनखेड, परमोरी, दहेगाव, वागळुद, पिंपरखेड, दहिवी, कोशिंबे, कादवा म्हाळुंगी, ओझरखेड, पोफशी, पुणेगाव तसेच दिंडोरी तालुक्यातील पश्चिम पट्यात जोरदार हजेरी लावली.
त्यामुळे शेतकरी वर्गाची मोठी धावपळ झाली. खरीप हंगामातील बरीच नगदी पिकांना परतीच्या पावसाचा धोका निर्माण झाला आहे. त्यात सोयाबीन, मका, मुग, उडीद इ. पिकांची अगोदरच वाट लागल्याने शेतकरी वर्गाने डोक्याला हात लावला असतांना आता पुन्हा एकदा परतीच्या पावसाने थैमान घातल्याने जवळ जवळ खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहे.
सध्या दिंडोरी तालुक्यात शेतकरी वर्गाला नगदी भांडवल मिळून देणारे टमाटा पिकांने बऱ्यापैकी बहर घेतला असतांना परतीचा पाऊस या पिकांची पुर्णपणे नुकसान करेल असे चित्र निर्माण झाले आहे . टमाटा पिक वाचविण्यासाठी शेतकरी वर्गाने मिळेल त्या ठिकाणाहून कर्ज घेऊन भांडवल उपलब्ध केले आहे. आता सर्व भर भरून निघेल या आशेवर जगणारा जगाचा पोशिंदा शेतकरी वर्ग पुर्णपणे भुई सपाट होण्याच्या मार्गावर आहे.

द्राक्षे पंढरीला परतीच्या पावसाचा विपरीत परिणाम
दिंडोरी तालुक्यातील द्राक्षे उत्पादक शेतकरी वर्गाला या परतीच्या पावसाचा मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण झाला आहे. सध्या बळीराजांची आॅक्टोबर छाटणीची तयारी चालू आहे. त्यासाठी मजुर, वेगवेगळ्या स्वरूपाची औषधांची खरेदी करून त्याचे पिकांना डोस रूपाने फवारणी केली जाते. परंतु अचानक झालेल्या पावसाने दिंडोरी तालुक्यातील द्राक्षे पंढरीतील शेतकरी याने हतबल झालाआहे. द्राक्षे हंगाम कसा घ्यावा ही मोठी समस्या निर्माण झाली आहे.

Web Title: Rains disrupt life in Dindori taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.