जिल्ह्यातील पिकांना पावसाचा तडाखा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 10:04 PM2020-06-16T22:04:03+5:302020-06-17T00:31:55+5:30

नांदूरशिंगोटे/चांदोरी : सिन्नर तालुक्यातील दापूर व चापडगाव परिसरात सोमवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिसरातील छोटे-मोठे बंधारे पावसाच्या पाण्याने भरले आहेत, तर काही भागात पावसाचे पाणी शेतात घुसल्याने शेतकऱ्यांची धावपळ उडाली.

Rains hit crops in the district! | जिल्ह्यातील पिकांना पावसाचा तडाखा !

जिल्ह्यातील पिकांना पावसाचा तडाखा !

Next



नांदूरशिंगोटे/चांदोरी : सिन्नर तालुक्यातील दापूर व चापडगाव परिसरात सोमवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने शेतातील
पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिसरातील छोटे-मोठे बंधारे पावसाच्या पाण्याने भरले आहेत, तर काही भागात
पावसाचे पाणी शेतात घुसल्याने शेतकऱ्यांची धावपळ उडाली.
दोन दिवसांपासून गोदाकाठ भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतात पाणी साचले आहे. गेल्या चार दिवसांपासून नांदूरशिंगोटे, दापूर, चापडगाव, चास व भोजापूर खोरे परिसरात मृगाच्या पावसाने दमदार हजेरी लावली. सोमवारी झालेल्या पावसाने
बहुतांश भागात शेताचे बांध तुडुंब भरले आहेत, तर काही भागात उभ्या पिकात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नासधूस झाली. चापडगाव परिसरात दुपारच्या सुमारास दोन तास मुसळधार पाऊस झाला. भोजापूर व चापडगाव भागात डोंगराळ परिसर असल्याने डोंगरदऱ्यांतून पाण्याचे लोट वाहिले. शेतांचे बांध फोडत पाणी सांगोळदरा परिसरातून थेट भोजापूर धरणापर्यंत पोहोचले.
-----------------
लखमापूर परिसरात
पेरण्यांना वेग
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर व परिसरात जोरदार पाऊस झाल्याने बळीराजाच्या चेहºयावर आनंद तरळू लागला आहे. परमोरी, अवनखेड, दहेगाव, करंजवण, म्हेळुसके, ओझे, ओझरखेड आदी गावांमध्ये जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. दिंडोरी तालुक्यात काही ठिकाणी पावसाची गरज होती. आता खरीप हंगामासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने शेतकरी शेतात काय उत्पन्न घ्यायचे याचे अंदाज बांधत आहेत. पेरणीयोग्य पाऊस झाल्याने बळीराजाने सोयाबीन व टमाटा
पिकाला पसंती दिल्याचे दिसत आहे. काही शेतकºयांनी ज्वारी, बाजरी, भुईमूग आदी बियाणे खरेदी करून तयारी सुरू केली आहे.
--------------------
बळीराजा सुखावला
चांदोरी : जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी शेतात पाणी घुसल्याने नुकसान झाले. जून महिन्याच्या सुरुवातीला व मृग नक्षत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. मागील दोन दिवसांपासून गोदाकाठ भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे शेताला तळ्याचे स्वरूप आले आहे.

Web Title: Rains hit crops in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक