पावसाने नाशिक जिल्ह्यात तिघांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 01:54 AM2018-11-06T01:54:42+5:302018-11-06T01:55:22+5:30

स्वाती नक्षत्राच्या रविवारच्या अखेरच्या दिवशी अवकाळी पावसाने जिल्हात वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावल्याने तिघांचा बळी गेला असून, काही ठिकाणी जनावरेही दगावली आहेत.

 The rains killed three people in Nashik district | पावसाने नाशिक जिल्ह्यात तिघांचा बळी

पावसाने नाशिक जिल्ह्यात तिघांचा बळी

Next

नाशिक : स्वाती नक्षत्राच्या रविवारच्या अखेरच्या दिवशी अवकाळी पावसाने जिल्हात वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावल्याने तिघांचा बळी गेला असून, काही ठिकाणी जनावरेही दगावली आहेत. या पावसामुळे रब्बीच्या पिकांना काही प्रमाणात लाभ होणार असला तरी, शेतात काढून ठेवलेला मका, बाजरी, सोयाबीन पिकांचे तसेच छाटणी केलेल्या द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे.
गेल्या तीन ते चार दिवसांपासून दिवसा उकाडा वाढला असून, अधूनमधून आकाशात ढगांची गर्दी होत असल्याने नागरिक घामाघूम होत आहेत. हवामानातील या बदलामुळे कमी दाबाचा पट्टा तयार होऊन रविवारी दुपारनंतर विजेचा कडकडाट व वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाने जिल्'ातील बहुतांशी भागात हजेरी लावली. त्यात वीज पडून नांदगाव तालुक्यातील पिंपराळे येथील महादेव सदगिर हा इसम जागीच ठार झाला तर देवळा तालुक्यातील माळवाडी येथे धोंडू सोनू बागुल यांच्या शेतात वीज पडून शेतातील चारा जळून खाक झाला. तालुक्यातीलच चिंचवे येथे पुंडलिक साबळे यांची म्हैस वीज पडून दगावली आहे. बागलाण तालुक्यातील द्याने येथे शेड
नेटचे काम करणारा श्ािंटू श्यामदेव चौहाण (२९) हा इसम वीज पडून मरण पावला.  चौहाण हा बिहार राज्यातील पाटणा जिल्'ातील शिवंजला येथील रहिवासी आहे. त्याचबरोबर दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथे नाल्याला आलेल्या पुरात वामन सदाशिव बस्ते (५५) हे वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक लोकांच्या मदतीने त्यांचा शोध घेतला जात आहे. निफाड तालुक्यातील आहेरगाव येथील त्र्यंबक एकनाथ गांगुर्डे यांच्या गट नंबर १०१ मध्ये वीज पडून गाय दगावली आहे.
चांदवड, देवळ्याला झोडपले
रविवारी अवकाळी पावसाने चांदवड, देवळा, मालेगाव या तालुक्यांना झोडपले. विजेचा कडकडाट, वादळी वाºयासह जोरदार कोसळलेल्या या पावसाने जनजीवन विस्कळीत केले. त्याचबरोबर शेतपिकांचे प्रचंड नुकसान झाले. अवघ्या काही तास कोसळलेल्या पावसात नाशिक ४, सिन्नर १, चांदवड ५८, देवळा ४१, येवला १५, नांदगाव ७, मालेगाव २२ व बागलाणला १ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला आहे.

Web Title:  The rains killed three people in Nashik district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.