नायगाव खो-यात होत असलेल्या पावसामुळे पीक सडु लागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 06:20 PM2020-10-21T18:20:16+5:302020-10-21T18:22:53+5:30
नायगाव - गेल्या चार दिवसांपासुन नायगाव खो-यात होत असलेल्या पावसामुळे पीक सडु लागली आहे.महागड्या कांदा पिकाचे अतोनात नुकसान होत असल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे.शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे.
नायगाव - गेल्या चार दिवसांपासुन नायगाव खो-यात होत असलेल्या पावसामुळे पीक सडु लागली आहे.महागड्या कांदा पिकाचे अतोनात नुकसान होत असल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे.शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे.
सिन्नरच्या उत्तर भागातील नायगाव खो-यात गेल्या चारपाच दिवसांपासून दररोज होणाऱ्या पावसामुळे शेतातील पिकांमध्ये पाणी साचत आहे.शेतातील पिके साचणा-या पाण्यामुळे सध्या अक्षरशः पिवळे पडुन सडु लागली आहे.मागील महिन्यात खरिपातील सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.सध्या नायगाव खो-यात दररोज पाऊस हजेरी लावत आहे.त्यामुळे शेतातील पिकांमधुन पाणी वाहू लागले आहे.कांदा बियाण्यांची टंचाई असतांनाही शेतकरी महागडी बियाणे खरेदी करून सध्या लागवड करत आहे.याच कांदा क्षेत्रात सध्या दररोज होणाऱ्या पावसाचे पाणी साचत असल्यामुळे शेतक-यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
कांदा बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक शेतक-यांनी कोथिंबीर,मेथी,शेपु,टमाटे,मिरची आदी भाजीपाल्याचे पिके घेतली मात्र या पिकांचेही या पावसामुळे मोठे नुकसान होत आहे.सर्वच पिके सडु लागल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.अशा परस्थितीत शासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी सध्या शेतकरी वर्गाकडुन केली जात आहे.
चौकट - खरिपा पाठोपाठ सध्या दररोज येणाऱ्या पावसामुळे रब्बीच्या पिकांचे नुकसान होत आहे.मी गेल्या आठवड्यात दोन एकर लाल कांद्याची लागवड केली आहे.मात्र चारपाच दिवासांपासून दररोज येणाऱ्या जोरदार पावसामुळे लागवड केलेल्या क्षेत्रात पाणी साचत आहे. या शेतात पाणी साचल्यामुळे कांदा पिक पिवळे पडुन सडु लागली आहे.शासनाने परिसरातील सर्वच पिकांचे पंचनामे करून भरपाई देण्याची गरज आहे.
- रघुनाथ दिघोळे. शेतकरी. जायगाव