‘लोकमत’वर स्नेहसदिच्छांचा वर्षाव

By Admin | Published: April 21, 2017 02:11 AM2017-04-21T02:11:48+5:302017-04-21T02:12:11+5:30

नाशिक : दोन दशकांपासून अधिक काळ वाचकांच्या हृदयसिंहासनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘लोकमत’वर विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी हजेरी लावत सदिच्छांचा वर्षाव करीत आपला स्नेहभाव वृद्धिंगत केला.

The rainy season on 'Lokmat' | ‘लोकमत’वर स्नेहसदिच्छांचा वर्षाव

‘लोकमत’वर स्नेहसदिच्छांचा वर्षाव

googlenewsNext

नाशिक : दोन दशकांपासून अधिक काळ वाचकांच्या हृदयसिंहासनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘लोकमत’वर विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आवर्जून हजेरी लावत सदिच्छांचा वर्षाव करीत आपला स्नेहभाव वृद्धिंगत केला. निमित्त होते... ‘लोकमत’च्या नाशिक आवृत्तीच्या बाविसाव्या वर्धापन दिनाचे !
अंबड येथील ‘लोकमत’च्या मुख्य कार्यालयातील हिरवळीवर गुरुवारी सायंकाळी हा दिमाखदार सोहळा रंगला. ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल व सहाय्यक उपाध्यक्ष बी.बी. चांडक यांनी शुभेच्छांचा स्वीकार केला. राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे या कार्यक्रमास विशेष करून उपस्थित होत्या. याशिवाय नाशिकच्या महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, हेमंत टकले, जयंत जाधव, डॉ.अपूर्व हिरे, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष नयना गावित, नाशिकचे उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी
समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, माजी महापौर अशोक मुर्तडक, दशरथ पाटील, अ‍ॅड. यतिन वाघ, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, माजी खासदार प्रतापदादा सोनवणे, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, तसेच जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, बीएसएनएलचे महाप्रबंधक नितीन महाजन,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ, कैलास मठाचे स्वामी संविदानंद सरस्वती, महंत भक्तीचरणदास, महानुभावपंथाचे महंत सुकेणेकर शास्त्री, शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्यासह राजकीय, प्रशासकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, औद्योगिक आदि क्षेत्रांतील मान्यवरांनी सोहळ्याला हजेरी लावत ‘लोकमत’ला वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

Web Title: The rainy season on 'Lokmat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.