शहर परिसरात सरींचा रिमझिम वर्षाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 01:18 AM2018-07-04T01:18:11+5:302018-07-04T01:18:38+5:30

नाशिक : सकाळपासून शहरात ढग दाटून आले होते. मंगळवारी (दि.३) सकाळी अकरा वाजता पावसाच्या सरींचा वर्षावाला सुरुवात झाली. दिवसभर अधूनमधून उघडीप देत रिमझिम सरींचा वर्षाव सुरूच होता.

Rainy showers in the city area | शहर परिसरात सरींचा रिमझिम वर्षाव

शहर परिसरात सरींचा रिमझिम वर्षाव

Next
ठळक मुद्दे शेतीच्या मशागतीला वेग आला आहे.

नाशिक : सकाळपासून शहरात ढग दाटून आले होते. मंगळवारी (दि.३) सकाळी अकरा वाजता पावसाच्या सरींचा वर्षावाला सुरुवात झाली. दिवसभर अधूनमधून उघडीप देत रिमझिम सरींचा वर्षाव सुरूच होता.
शहरात समाधानकारक पावसाची हजेरीची प्रतीक्षा नागरिकांना असून सोमवारपासून जिल्ह्यात पावसाला काही प्रमाणात चांगली सुरुवात झाली असून शेतीच्या मशागतीला वेग आला आहे.
शहरातही सकाळपासून पावसाला सुरुवात झाली; मात्र पाऊस उघडीप देत हलक्या सरींचा वर्षाव सुरू होता. दिवसभरात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले; मात्र पावसाचे वातावरण सूर्यास्तापर्यंत कायम होते. रिमझिम पावसाने रस्ते ओले झाले होते व नागरिक रेनकोटचा वापर करताना दिसून आले.
रिमझिम पावसाने नागरिकांची दिवसभर काही प्रमाणात का होईना तारांबळ उडत होती. संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांनी रिमझिम पावसात भिजण्याचा आनंद लुटला. पावसाळी वातावरण झाल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला
२६ अंशावरून ३१ अंशापर्यंत मागील सहा दिवसांत पोहचलेले कमाल तपमान पुन्हा सोमवारी घसरण्यास मदत झाली. सोमवारी कमाल तपमान २६ अंश इतके नोंदविले गेले. इंदिरानगर, वडाळागाव, सिडको, अंबड या भागात संध्याकाळनंतर चांगल्या प्रमाणात सरींचा वर्षाव झाला. रात्री साडे आठ वाजेपर्यंत १.१ मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली होती.ढगाळ हवामान : समाधानकारक पावसाला सुरूवात होण्याची आशा, शहरात दुपारपासून रिमझिम पावसाच्या सरींचा वर्षावउत्तर महाराष्टÑात येत्या चोवीस तासात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली होती. मात्र सोमवारी दिवसभर पावसाची केवळ रिपरिप झाल्याने नाशिककरांची पुन्हा निराशा झाली. हवेत गारवा वाढल्याने शहराचे तापमान कमी झाले आहे. रात्री साडे आठ वाजेपर्यंत १.१ मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली होती. सहा दिवसांत पोहचलेले कमाल तपमान कमी झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला

Web Title: Rainy showers in the city area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.