वाके परिसरात पावसाची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 12:52 AM2018-09-03T00:52:42+5:302018-09-03T00:53:12+5:30
वाके : पिण्याच्या पाण्याचा व चाºयाचा प्रश्न भविष्यात ‘आ’ करून उभा असल्याने वाकेसह मुंगसे, नांदगाव, पाटणे परिसरातील शेतकरी जोरदार पावसासाठी आकाशाकडे डोळे लावून बसले आहे.
वाके : पिण्याच्या पाण्याचा व चाºयाचा प्रश्न भविष्यात ‘आ’ करून उभा असल्याने वाकेसह मुंगसे, नांदगाव, पाटणे परिसरातील शेतकरी जोरदार पावसासाठी आकाशाकडे डोळे लावून बसले आहे.
संपूर्ण जून, जुलै व काही प्रमाणात आॅगस्ट महिन्यातही एक-दोन वगळता सर्वच पावसाची नक्षत्रे कोरडी गेल्याने आता तर सप्टेंबर महिना उजाडूनही पावसाने पाठ फिरविल्याने परिसरात चिंतेचे वातावरण आहे. खरिपाच्या केलेल्या पेरण्यातील पिकांची वाताहात होताना दिसून येत आहे. पिण्याच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या वैरणाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. अशा परिस्थितीमध्ये वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी गावा-गावांत सप्ताहासह धार्मिक विधी करण्यात येत आहेत. गेल्या महिन्यात जोरदार पाऊस पडावा यासाठी वाके येथील तरुण व महिलांनी डोक्यावर कळशी घेऊन परिसरातील गावा-गावांत जाऊन ‘धोंडी-धोंडी पाणी दे’ चा गजर करीत वरुणराजाला साकडे घातले होते. पण एवढे करूनही वरुण राजाचा रुसवा कायम असल्याने परिसरातील शेतकरीबांधव चिंताग्रस्त दिसून येत आहेत.संपूर्ण जून, जुलै व काही प्रमाणात आॅगस्ट महिन्यातही एक-दोन वगळता सर्वच पावसाची नक्षत्रे कोरडी गेल्याने आता तर सप्टेंबर महिना उजाडूनही पावसाने पाठ फिरविली असल्याने परिसरात चिंतेचे वातावरण आहे. खरिपाच्या केलेल्या पेरण्यातील पिकांची वाताहत होताना दिसून येत आहे. पिण्याच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या वैरणाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.