डेंग्यू निर्मूलनासाठी भगूर पालिकेची जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:16 AM2019-07-24T00:16:33+5:302019-07-24T00:17:30+5:30
शहरात डेंग्यूसदृश आजाराला आळा घालण्यासाठी नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने परिसरात जनजागृती करण्याबरोबरच स्वच्छता मोहीमही हाती घेतली असून, नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहनही केले जात आहे.
भगूर : शहरात डेंग्यूसदृश आजाराला आळा घालण्यासाठी नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने परिसरात जनजागृती करण्याबरोबरच स्वच्छता मोहीमही हाती घेतली असून, नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहनही केले जात आहे.
डेंग्यू निर्मूलनासाठी नगरपालिका जिल्हा हिवताप आरोग्य विभागाने युद्धपातळीवर विविध उपाययोजना सुरू करून शाळांचा परिसरात वाडी, वस्तीच्या ठिकाणी जनजागृती कार्यक्रम घेतला जात आहे. यामध्ये स्वच्छता राखणे व डास निर्बंध धुराची फवारणी करणे अशी मोहीम सुरू करण्यात आली असल्याची माहिती आरोग्य पर्यवेक्षक डॉ. एस. एन. शेख यांनी दिली आहे.
शहरात दोन डेंग्यू रु ग्ण आढळले असून, इतर रु ग्ण नाशिक जिल्हा रु ग्णालयात व खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल झाल्याचे समजताच नाशिक जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विलास देवळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य खात्याने भगूर गावाची गंभीर दखल परिसरात स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. आरोग्य विभागाकडून नवीन दोन डास निर्मूलन धुराची यंत्रे व वैद्यकीय साहित्य दिले. शाळेत मुलांना डेंग्यूसमस्या विषयावर डासांची निर्मिती रोखण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात याबाबतची माहिती सांगून पथनाट्येद्वारे जनजागृती केली जात आहे.
नगरसेवक आर. डी. साळवे, उपाध्यक्ष प्रतिभा घुमरे, प्रमोद घुमरे यावेळी उपस्थित होते. त्यांनी प्रशासनाचे अनेक कामांकडे लक्ष वेधले. चिखलाच्या रस्त्यावर मुरु ड टाकण्याची मागणी त्यांनी केली. त्यामुळे परिसरात अनेक ठिकाणी मुरूमही टाकण्यात आला. कार्यालय अधीक्षक रमेश राठोड, रवींद्र संसारे यांनी केली. सामाजिक कार्यकर्ते अजय वाहणे, हर्षवर्धन साळवे, वैभव दाणी, अरु ण साळवे, विजय पांडे, निखिल भालेराव, सुनील साळवे, योगेश साळवे यांनी सहकार्य केले. पालिका मुख्याधिकारी प्रतिभा पाटील, नगराध्यक्ष अनिता करंजकर, रघुनाथ साळवे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, डॉ. एस एन. शेख यांनी मोहिमेचे नियोजन केले होते.
नूतन शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग
नूतन विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांची गावातून फेरी काढून जनजागृती केली. यामध्ये शिक्षक सहभागी झाले होते. डास निर्मूलन धुराळा मशीनने प्रथमच संपूर्ण गावात फवारणी करण्यात आली, तर सांडपाण्याच्या डबक्यात औषधे टाकून स्वच्छता केली. काही ठिकाणी गप्पीमासे पाण्यात सोडून डास नियंत्रणाचा प्रयत्न करण्यात येत आहे.