कांदा निर्यातबंदी उठवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 10:20 PM2020-02-12T22:20:08+5:302020-02-12T23:55:31+5:30

राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, शासनाने कांदा निर्यातबंदी उठवावी अशा मागणीचे निवेदन कॉँग्रेसतर्फे अपर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

Raise onion export ban! | कांदा निर्यातबंदी उठवा !

कांदा निर्यातबंदी उठवावी या मागणीचे निवेदन अपर जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार रवींद्र सायंकर यांना देताना कॉँग्रेसचे डॉ. तुषार शेवाळे, डॉ. राजेंद्र ठाकरे, संजय पाटील, डॉ. अरुण पठाडे, वाय. के. खैरनार, मनोज देवरे, उमेश शेवाळे, दत्तात्रय खैरनार, नितीन बच्छाव, भाऊसाहेब सूर्यवंशी, प्रदीप जगताप, सतीश गरुड, आनंद सोनवणे.

Next
ठळक मुद्देमालेगाव : कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिले निवेदन

 मालेगाव : राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, शासनाने कांदा निर्यातबंदी उठवावी अशा मागणीचे निवेदन कॉँग्रेसतर्फे अपर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, शेतकºयांना हमखास उत्पन्न देणारे कांदा हे पीक आहे. कांद्यामुळे शेतकºयांच्या प्रपंचाला हातभार लागतो. शेतकºयांच्या मुलांना शिक्षणासाठी लागणारा पैसा कांद्यामुळे भरणे शक्य होते. शासनाने कांदा निर्यातबंदी केल्यामुळे कांदा उत्पादक शेतकºयांचे हाल होत आहेत. शासनाने याचा विचार करून कांदा निर्यातबंदी उठवावी, अशी मागणी करण्यात आली.
निवेदनावर जिल्हा कॉँग्रेसअध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे, तालुका सरचिटणीस संजय पाटील, डॉ. अरुण पठाडे, वाय. के. खैरनार, मनोज देवरे, उमेश शेवाळे, दत्तात्रय खैरनार, नितीन बच्छाव, भाऊसाहेब सूर्यवंशी, प्रदीप जगताप, सतीश गरुड, आनंद सोनवणे आदींच्या सह्या आहेत. गेल्या वर्षभरात शेतकºयांवर विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती आल्या आहेत. यामुळे शेतकरी कर्ज फेडू शकलेले नाही. नवीन पिके लावल्यानंतर औषध फवारणी आणि मशागतीसाठी खर्च झालेला आहे. अनेक पिकांना बाजारात भाव मिळालेला नाही. हाती येणाºया कांदा उत्पादनावर पुढील आर्थिक व्यवस्थापन अवलंबून आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Raise onion export ban!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.