आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना उभारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 10:55 PM2020-10-10T22:55:37+5:302020-10-11T00:39:20+5:30
जानोरी : आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या वारसांना शासकीय नियमाप्रमाणे आर्थिक मदत दिल्यानंतर प्रशासकीय जबाबदारी संपते. परंतु सामाजिक जबाबदारी म्हणून महसूल विभागाने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी उभारी हा कार्यक्र दिंडोरी तालुक्यात राबविला जात आहे. या कार्यक्र मा अंतर्गत दिंडोरी तालुक्यातील कोराटे येथील बापू दिगंबर कदम या आत्महत्याग्रस्त शेतकर्याच्या कुटुंबीयांच्या अडचणी समजून घेऊन त्या तात्काळ सोडून त्यांना उभारी देण्याचा प्रयत्न केला आहे.
जानोरी : आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या वारसांना शासकीय नियमाप्रमाणे आर्थिक मदत दिल्यानंतर प्रशासकीय जबाबदारी संपते. परंतु सामाजिक जबाबदारी म्हणून महसूल विभागाने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी उभारी हा कार्यक्र दिंडोरी तालुक्यात राबविला जात आहे. या कार्यक्र मा अंतर्गत दिंडोरी तालुक्यातील कोराटे येथील बापू दिगंबर कदम या आत्महत्याग्रस्त शेतकर्याच्या कुटुंबीयांच्या अडचणी समजून घेऊन त्या तात्काळ सोडून त्यांना उभारी देण्याचा प्रयत्न केला आहे. महसूल विभागाने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला उभारी देण्यासाठी शासनाच्या विविध विभागातील अधिकार्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची भेट घ्यावी त्यांची सध्या परिस्थिती समजून घेत त्या कुटुंबाला शासनाच्या कोणकोणत्या योजनेचा लाभ देता येईल हे निश्चित करून त्यानुसार त्यांना लाभ देण्यासाठी उभारी हा कालबद्ध कार्यक्र म सुरू केलेला आहे. हा कार्यक्र म यशस्वी करण्यासाठी दिंडोरी उभा विभागीय अधिकारी संदीप आहेर यांनी नियोजन त्याअंतर्गत त्यांनी तालुक्यातील उपविभागीय समतिी गठीत केलेली आहे. त्यासाठी दिंडोरी तालुक्याचे तहसीलदार सहाय्यक निबंधक गटविकास अधिकारी तालुका कृषी अधिकारी व नायब तहसीलदार यांची समतिीत नियुक्ती केलेली आहे. कोराटे येथील बापू दिगंबर कदम या आत्महत्याग्रस्त कुटुंबास उपविभागीय अधिकारी ज्योती कावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ोट देऊन त्यांची आर्थिक स्थिती तसेच शासन दरबारी प्रलंबित कामे अडचणी समजून घेतल्या. अशाप्रकारे तालुक्यात झालेल्या 31 आत्महत्याग्रस्त कुटुंबांना भेटण्यासाठी तालुक्यातील अधिकार्यांचे पथके निर्माण केली असून आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना उभारी देणार असल्याने तहसीलदार पवार यांनी सांगितले.