राज-पवार एकाच दिवशी नाशकात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 12:00 AM2019-10-12T00:00:16+5:302019-10-12T00:31:46+5:30

राष्टÑवादी कॉँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार आणि मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे हे दोन्ही नेते १६ आॅक्टोबरला नाशिकमध्ये येणार आहेत. दोन्ही पक्षप्रमुख एकाच दिवशी नाशिकला येणार असल्याने मनसे आणि राष्टÑवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये त्याचीच चर्चा रंगली आहे.

Raj-Pawar in Nashik one day | राज-पवार एकाच दिवशी नाशकात

राज-पवार एकाच दिवशी नाशकात

Next
ठळक मुद्देभूमिकेकडे लक्ष : दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता

नाशिक : राष्टÑवादी कॉँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार आणि मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे हे दोन्ही नेते १६ आॅक्टोबरला नाशिकमध्ये येणार आहेत. दोन्ही पक्षप्रमुख एकाच दिवशी नाशिकला येणार असल्याने मनसे आणि राष्टÑवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये त्याचीच चर्चा रंगली आहे.
राज्यात नाशिक, पुणे आणि ठाणे अशा तीन महानगरांमध्ये राष्टÑवादी आणि मनसेने पक्षीय स्तरावर समझोता घडवून आणला आहे. पुण्यातील कोथरूड आणि ठाणे शहराच्या जागेवर मनसेच्या उमेदवाराला राष्टÑवादीने पाठिंबा देत त्यांच्या उमेदवाराला माघारी घेण्यास सांगितले, तर नाशिक पूर्वमध्ये उभ्या असलेल्या मनसेच्या उमेदवाराला राष्टÑवादीच्या उमेदवारासाठी माघार घेण्याचे आदेश आल्याने या तीन जागांवर मनसे आणि राष्टÑवादीत समन्वय घडून आला आहे. त्यामुळे १६ आॅक्टोबरला जेव्हा दोन्ही पक्षप्रमुख नाशकात असतील, त्यावेळी नाशिक पूर्वसाठी काही विशेष बैठका घेतल्या जाणार का? याबाबत कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला बहर आला आहे.
राज ठाकरे यांची २०१४ पर्यंत भाजपच्या बाजूची भाषा होती नंतर मात्र ते पूर्णत: भाजप-सेनेच्या विरोधात भूमिका घेऊ लागले आणि त्यानंतर तर राष्टÑवादीचे नेते शरद पवार यांच्याशी त्यांची जवळीक वाढली. लोकसभेनंतर राज्यात आघाडी करण्याच्या चर्चा सुरू झाल्या असताना मनसेलादेखील आघाडीत घेण्याच्या चर्चा सुरू होत्या. राष्टÑवादी पक्ष त्यासाठी अनुकूल होता; मात्र हा विषय मागे पडला. त्यानंतर राज यांनी आधी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता नंतर मात्र त्यांनी मुंबई, पुणे व नाशिक येथेच निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
तीन जागा भविष्यातील ‘लिटमस टेस्ट’
कॉँग्रेसने नकार दिल्यामुळे मनसेला आघाडीत स्थान मिळाले नसले तरी राष्टÑवादीने त्यांच्या वाटेच्या जागांमधून मनसेला दोन जागी मदत दिली, तर नाशिकच्या एका जागेवर मदत घेतली आहे. या तीन जागांवर नक्की कसा रिझल्ट लागतो, ते पाहून भविष्यात मनसेबाबत व्यूहरचना आखण्याचा आघाडीचा मानस असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे हे तीन मतदारसंघ हे मनसेला आघाडीत समाविष्ट करण्यासाठीची ‘लिटमस टेस्ट’ असल्याचीही चर्चा आहे.

Web Title: Raj-Pawar in Nashik one day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.