राज म्हणतात, मंत्र्यांना कांदे फेकून मारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 05:47 PM2018-12-19T17:47:40+5:302018-12-19T17:47:57+5:30

कांदा उत्पादकांशी संवाद : कळवण, सटाणा भागात दौरा

Raj says, throw ministers to throw onions! | राज म्हणतात, मंत्र्यांना कांदे फेकून मारा!

राज म्हणतात, मंत्र्यांना कांदे फेकून मारा!

Next
ठळक मुद्देकांदा लागल्याने जर मंत्री बेशुद्ध पडला तर तोच कांदा फोडा आणि त्याच्या नाकाला लावा, असेही सांगायला राज विसरले नाहीत.

कळवण : कांदे रस्त्यावर फेकू नका. त्यात तुमचेच नुकसान होणार आहे. सरकारला काही फरक पडत नाही. त्यामुळे तुम्ही सेना-भाजपा युतीच्या मंत्र्यांना कांदे फेकून मारा, असा सल्ला महाराष्ट नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कळवण येथे कांदा उत्पादकांशी संवाद साधताना दिला. कांदा लागल्याने जर मंत्री बेशुद्ध पडला तर तोच कांदा फोडा आणि त्याच्या नाकाला लावा, असेही सांगायला राज विसरले नाहीत. दरम्यान, कळवण आणि सटाणा येथे राज यांच्या दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
दोन दिवसांपासून जिल्हा दौ-यावर असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी (दि. १९) कळवण येथील पदाधिकारी, कांदा उत्पादक शेतकरी, व्यापारी व उद्योजक यांच्यासह बेरोजगार युवा-युवती यांच्याशी संवाद साधला. राज यांचे कळवण शहरात आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल ताश्यांच्या गजरात मनसैनिकांनी स्वागत केले. उद्योगपती बेबीलाल संचेती यांच्या निवासस्थानी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आगमन झाल्यानंतर बेबीलाल संचेती यांच्यासह सुनील संचेती, निर्मला संचेती तसेच मनसे तालुकाध्यक्ष शशी पाटील, शहराध्यक्ष डॉ. दीपक शेवाळे, माजी शहराध्यक्ष नितीन पगार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी माजी सैनिक संघटना, महाराष्ट्र कोतवाल संघटना, डॉक्टर असोसिएशन यांनी भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले. याप्रसंगी मनसे तालुकाप्रमुख शशिकांत पाटील, शहराध्यक्ष डॉ. दीपक शेवाळे, अजय दुबे, उपाध्यक्ष चेतन मैंद, दीपक दुसाने, कृष्णा जगताप, उमेश भास्कर, सुरज पगार, नीलेश शिंदे, केदा गवांदे, संदीप पवार, रोहन निकम, रोशन निकम, अक्षय सोनवणे, उदय सोनवणे, पराग मालपुरे, कुणाल वडखळे, सुशांत मोरे, विनय कोठावदे, अमोल सोनवणे, उदय पिंगळे, आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Raj says, throw ministers to throw onions!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.