राज ठाकरे : नाशकात मनसेच्या पदाधिकाºयांना मार्गदर्शन मार खाणारे नव्हे, देणारे कार्यकर्ते हवेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 01:36 AM2017-11-11T01:36:17+5:302017-11-11T01:37:27+5:30

मला रडणारे कार्यकर्ते आवडत नाहीत. दुसºयाची तक्रार घेऊन येणारा महाराष्टÑ सैनिक नको, तर तुमची कुणीतरी तक्रार घेऊन यायला हवी. मार खाणारे नव्हे, मार देणारे कार्यकर्ते हवेत. महापालिका, विधानसभा, लोकसभेपुरता नाही, तर माझी ताकद रस्त्यावर आहे. ‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर दिलेच पाहिजे, अशा परखड शब्दांत महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पराभवाने खचलेल्या व मरगळलेल्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

Raj Thackeray: The MNS office bearers in the Nashik should not be guided by the guidance, but the activists who give it! | राज ठाकरे : नाशकात मनसेच्या पदाधिकाºयांना मार्गदर्शन मार खाणारे नव्हे, देणारे कार्यकर्ते हवेत!

राज ठाकरे : नाशकात मनसेच्या पदाधिकाºयांना मार्गदर्शन मार खाणारे नव्हे, देणारे कार्यकर्ते हवेत!

Next
ठळक मुद्देपदाधिकाºयांसह कार्यकर्त्यांशी संवाद पक्ष स्थापनेच्या वेळी पाठीमागे कोण होते?पक्षसंघटनेच्या पुनर्रचनेवर भर

नाशिक : मला रडणारे कार्यकर्ते आवडत नाहीत. दुसºयाची तक्रार घेऊन येणारा महाराष्टÑ सैनिक नको, तर तुमची कुणीतरी तक्रार घेऊन यायला हवी. मार खाणारे नव्हे, मार देणारे कार्यकर्ते हवेत. महापालिका, विधानसभा, लोकसभेपुरता नाही, तर माझी ताकद रस्त्यावर आहे. ‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर दिलेच पाहिजे, अशा परखड शब्दांत महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पराभवाने खचलेल्या व मरगळलेल्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
महापालिका निवडणुकीनंतर पहिल्यांदाच नाशिक दौºयावर आलेल्या राज ठाकरे यांनी गंगापूररोडवरील चोपडा बॅँक्वेट हॉल येथे आयोजित मेळाव्यात पदाधिकाºयांसह कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राज यांनी सांगितले, मला कुणी भेटायला येत नाही, परंतु जे येतात ते फोटो काढण्यासाठी येतात. फोटो काढण्यापेक्षा मी जे सांगतो त्याचा विचार करा. महाराष्टÑात असे काम करा, की तुमचे फोटो झळकले पाहिजेत. तुमच्या जागी राज ठाकरे आहे, असे समजून जबाबदारी पार पाडा. पक्ष स्थापनेच्या वेळी माझ्या पाठीमागे कोण होते? परंतु, शिवतीर्थावरील सभेला तुम्ही लोक आला नसता तर माझ्या आयुष्याचा सोक्षमोक्ष लागला असता. अगोदरचे दोर कापून टाकावे लागतात तेव्हा कुठे गड सर करता येतो, असेही राज ठाकरे यांनी सांगितले. आज नाशिककरांना राज ठाकरे काय करत होता, याची जाणीव होत असेल.
परत यायचे असेल तर...
राज यांनी सांगितले, आता पक्ष सोडून गेलेल्या अनेकांना परत यायचे आहे. परत यायचे म्हणजे ती काय बस आहे काय? एक हुकली की दुसरी. परत यायचेच असेल तर पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल. पुढील आठवड्यात पक्षाचे नेते नाशिकला येतील. त्यावेळी पक्षसंघटनेच्या पुनर्रचनेवर भर दिला जाईल. गटाध्यक्षांपासून शाखाध्यक्षांपर्यंत नेमणुका केल्या जातील. जे बाहेर गेलेले ते तळाला जातील. मला कुणाची गरज नाही, असेही राज यांनी सुनावले.
कुठे गेले नमोरुग्ण?
राज यांनी भाजपावरही टीकास्त्र सोडले. भाजपाची वर्षभरापूर्वीची स्थिती आणि आजची स्थिती बघा. कुठे गेले नमोरुग्ण? एक एसएमएस टाकला की ते तुटून पडत होते. आता सिलिंडर, पेट्रोल महाग झाल्याने घरातूनच लाथा बसल्या. जे सांगितले त्याचे प्रत्यक्षात काय झाले? किती वेळ थापा मारणार, असे सांगत राज यांनी महापालिकेतील भोंगळ कारभारावर तुटून पडण्याचे आदेश दिले.
भविष्यात मी पक्ष काढेल, असे मला माहीत नव्हते. राजकारणात मी अपघाताने आलो. कॉलेजमध्ये असताना मला अमेरिकेतील वर्ल्ड स्टुडिओत जाऊन अ‍ॅनिमेटर व्हायचे होते. परंतु, त्यावेळी तेथे पोहोचण्याचे माध्यम नव्हते. तेथूनच राजकीय व्यंगचित्रकला सुरू केली. मनात राजकीय विचार करण्याची तयारी होतीच. पुढे जे घडत गेले ते तुम्हाला माहिती आहे, असेही राज यांनी सांगितले.

Web Title: Raj Thackeray: The MNS office bearers in the Nashik should not be guided by the guidance, but the activists who give it!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.